"आमची मुलगीच वाईट, तिला जगण्याचा अधिकार नाही, फाशी द्या"; आई-वडिलांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:15 IST2025-03-19T17:14:51+5:302025-03-19T17:15:14+5:30
मुस्कानच्या आईने सांगितले की, सौरभने या मुलीसाठी त्याचं कुटुंब सोडलं होतं पण हिने त्याच्यासोबतच वाईट केलं.

"आमची मुलगीच वाईट, तिला जगण्याचा अधिकार नाही, फाशी द्या"; आई-वडिलांचा मोठा खुलासा
मेरठमध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली, त्याच्या मृतदेहाचे १५ तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये टाकले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली आहे. आता या प्रकरणात मुस्कानच्या आईने आपली मुलीला चुकीचं वागत असल्याचं म्हटलं आहे.
एनडीटीव्हीने आरोपी मुस्कानच्या पालकांशी संवाद साधला. याच दरम्यान पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानच्या आईने सांगितलं की, लग्न झाल्यापासून ते दोघेही सौरभच्या घरापासून वेगळे राहत होते. भाड्याच्या घरात राहत होती. कारण मुलीचे तिच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध नव्हते, त्यांच्यासोबत पटत नव्हतं. पण हे सर्व असूनही सौरभ तिच्यावर आंधळं प्रेम करत होता. आमची मुलगीच वाईट होती, तिनेच त्याला घरापासून वेगळे केलं.
मुस्कानच्या आईने सांगितले की, सौरभने या मुलीसाठी त्याचं कुटुंब सोडलं होतं पण हिने त्याच्यासोबतच वाईट केलं. मुस्कानच्या वडिलांनी सांगितलं की, तिला जगण्याचा अधिकार नाही आणि तिला फाशी देण्यात यावी. आई म्हणाली की, तिचं १० किलो वजन कमी झालं होतं. आम्हाला वाटलं की कदाचित सौरभच्या आठवणींमुळे ती बारीक झाली असेल पण आम्हाला माहित नव्हतं की साहिल तिला ड्रग्ज देत होता.
पोलिसांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला की, पतीला जेवणात काही अमली पदार्थ देऊन बेशुद्ध करून त्याची हत्या करण्यात आली. खुनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. ४ मार्च रोजी हत्या केल्यानंतर, मुस्कान आणि साहिल फिरायला गेले. मुस्कान घरी परतली तेव्हा तिने तिच्या आईला सौरभच्या हत्येबद्दल सांगितलं. आईनेच पोलिसांना याबद्दल माहिती दिली.