खोटं डेथ सर्टिफिकेट दाखवून १५ वर्षे फरार राहिला कैदी, एका फोटोमुळे पुन्हा पोलिसांच्या हाती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 02:58 PM2021-03-20T14:58:24+5:302021-03-20T15:00:08+5:30

आरोपीने सांगितले की, हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने खोटं डेथ सर्टिफिकेट दिलं होतं.

Meerut murderer death certificate victoria park fire burnt alive police supreme court | खोटं डेथ सर्टिफिकेट दाखवून १५ वर्षे फरार राहिला कैदी, एका फोटोमुळे पुन्हा पोलिसांच्या हाती!

खोटं डेथ सर्टिफिकेट दाखवून १५ वर्षे फरार राहिला कैदी, एका फोटोमुळे पुन्हा पोलिसांच्या हाती!

Next

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये १० एप्रिल २००६ रोजी झालेल्या व्हिक्टोरिया पार्क अग्नीकांडात ६७ लोक जिवंत जळाले होते. तर शेकडो लोक यात जखमी झाले होते. यावेळी एक हत्येचा आरोपी मृत झाल्याची माहिती मिळाली होती. इतकेच नाही तर आरोपीचं डेथ सर्टिफिकेटही मिळालं होतं. पण १५ वर्षांनी जेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला तर पोलीस हैराण झाले. 

पोलिसांनुसार, आम्हाला हत्येच्या आरोपीचं डेथ सर्टिफिकेट मिळालं होतं. ज्यात लिहिलं होतं की, अनिराज सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. पण या गुरूवारी बुलंदशहर पोलिसांनी त्याला जिवंत धरलं आहे. जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आरोपीने सांगितले की, हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने खोटं डेथ सर्टिफिकेट दिलं होतं. (हे पण वाचा : बोंबला! मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवरी फरार, कारण...)

पोलिसांनुसार, व्हिक्टोरिया पार्क अग्नीकांडात स्वत:ला मृत दाखवून आरोपी १५ वर्षे फरार होता. अनिराजच्या कुटुंबियांनी २००६ साली पोलिसांना त्याचं डेथ सर्टिफिकेट दिलं होतं. सांगिण्यात आले होते की, अनिराजचा मृत्यू व्हिक्टोरिया पार्क अग्नीकांडात झाला. त्यानंतर पोलिसांनी हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात पाठवला होता. 

२०२० मध्ये अनिराजच्या नातेवाईकांनी सूचना दिली की, अनिराज जिवंत आहे. आरोपी जिवंत असल्याचे समजल्यावर पोलिसात खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच पोलिसांनी अनिराजवर २० हजार रूपये बक्षीसही ठेवलं. (हे पण वाचा : महिलेने कोर्टात दिली याचिका, तुरूंगात असलेल्या पतीसोबत शरीरसंबंधाची मागितली परवानगी!)

१६ वर्षापासून करत होता गार्डची नोकरी

बुलंदशहर पोलीस टीमने अनिराजला गुरूवारी अटक केली. त्याच्याकडून एक देशी पिस्तुल आणि जिवंत काडतूस ताब्यात घेतले. सध्या तो पत्नी आणि मुलांसोबत उत्तराखंडच्या रूद्रपूरमध्ये राहून सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होता. १६ वर्षापर्यंत गुरूग्राम नोएडा मेरठ आणि रूद्रपूरमद्ये गार्डची नोकरी करत होता.

डेथ सर्टिफिकेटनंतर शोध बंद

२००४ मध्ये अनिराज काही दिवसांसाठी पेरोलवर बाहेर आला होता. दिवस पूर्ण झाले तरी तो तुरूंगात पोहोचला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पण तो काही सापडला नाही. अनिराजच्या कुटुंबियांनी त्याचं डेथ सर्टिफिकेट अधिवक्त्याच्या हाताने कोर्टात पाठवलं होतं. या आधारावरच पोलिसांनी त्याचा शोध घेणं थांबवलं.

कुठे लपायचा?

जन्मठेप आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अनिराज सिंहने आपलं नाव आणि लूक बदलला. १६ वर्ष तो गुरूग्राम, नोएडा, मेरठ, रूद्रपूर इत्यादी ठिकाणांवर इंडस्ट्रीजमध्ये लपत होता. जास्तीत जास्त ठिकाणी त्याने सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, स्वत:ला मृत सांगत १५ वर्षांपर्यंत फरार राहिलेला अनिराज सिंह एका फोटोमुळे पकडण्यात आला. २ वर्षांपूर्वी तो एके ठिकाणी आला होता. तिथे फोटोसेशन झालं होतं. तो फोटो व्हायरल झाला होता. गावातील काही लोकांनी फोटो पाहून अनिराजला ओळखलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.  
 

Web Title: Meerut murderer death certificate victoria park fire burnt alive police supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.