मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:30 IST2025-10-11T12:28:16+5:302025-10-11T12:30:02+5:30

पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये मैत्रिणीसोबत गोल गप्पा खायला गेलेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. तिच्या मैत्रिणी वासू अलीची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Medical student goes out for a walk with friend, accused of sexual assault Treatment underway in hospital | मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू

मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू

मागील वर्षी कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेज रुग्णालयात एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. आता दुर्गापूरमध्ये एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे, यामुळे शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पीडिता सध्या शोभापूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तिचे नातेवाईकही दुर्गापूरला आले आहेत आणि महाविद्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ही विद्यार्थिनी ओडिशातील जलेश्वरची रहिवासी आहे.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया

विद्यार्थिनी मित्रासोबत फिरायला गेली होती

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ती तिच्या मित्रासोबत बाहेर गेली होती. वाटेत दोन-तीन तरुणांनी तिला थांबवले आणि जबरदस्तीने तिला पकडून नेले. ते तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले, तिथे एका पुरूषाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा मित्र वासू अली याच्यावरही पोलिसांचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच, पीडितेचे पालक शनिवारी सकाळी दुर्गापूर येथे पोहोचले. पोलिसही रुग्णालयात पोहोचले, पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिचा जबाब नोंदवला. विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्यांना त्यांच्या मुलीच्या मित्रावरही संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेत प्रत्यक्षात किती लोक सामील होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरोपींना अटक करण्याची मागणी

पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तपास जसजसा पुढे जाईल तसतशी माहिती शेअर करतील असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माहिती मिळताच भाजप युवा मोर्चाचे नेते पारिजात गांगुली आणि संतोष मुखर्जी यांनीही पोलिसांची भेट घेतली. पारिजात यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Web Title : दोस्त के साथ घूमने गई मेडिकल छात्रा से यौन उत्पीड़न; जांच जारी।

Web Summary : दुर्गापुर में एक मेडिकल छात्रा के साथ दोस्त के साथ बाहर जाने के बाद कथित तौर पर यौन उत्पीड़न हुआ। घटना सुरक्षा को लेकर चिंता बढ़ाती है। पुलिस जांच कर रही है, और पीड़िता का इलाज चल रहा है। उसका दोस्त भी संदेह के घेरे में है। बीजेपी नेताओं ने आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की है।

Web Title : Medical student sexually assaulted after outing with friend; investigation ongoing.

Web Summary : A medical student in Durgapur was allegedly sexually assaulted after going out with a friend. The incident raises concerns about safety. Police are investigating, and the victim is receiving treatment. Her friend is also under suspicion. BJP leaders demand immediate arrest of the accused.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.