शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दाऊद इब्राहिमच्या पुतण्याविरोधात मोक्का दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:28 PM

पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या होत्या.

ठळक मुद्देव्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला बेड्या बांधकाम आणि चीन, दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. 18 जुलैला रात्री तो मिळेल त्या विमानाने दुबईला पळण्याच्या प्रयत्नात होता.

मुंबई - खंडणी विरोधी पथकाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल कासकरविरोधात मोक्काअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या होत्या.

बांधकाम आणि चीन, दुबईहून इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आयात करणाऱ्या व्यावसायिकाने ही तक्रार केली होती. त्याने तीन वर्षांपूर्वी अश्‍फाक रफिक टॉवलवाला याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता. त्याला अश्‍फाककडून १५ लाख ५० हजार रुपये येणे शिल्लक होते. त्यासाठी त्याने अनेकदा मागणी केली होती. त्यावेळी अहमद राजा अफ्रोज वधारिया याने १२ जूनला धमकीचा फोन केला होता. त्यावेळी त्याने आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक फहिम मचमच याचा हस्तक असल्याचे सांगून धमकावले. त्यावेळी इक्बाल कासकरचा मुलगा रिजवान याने ही त्या व्यावसायिकाला धमकावले होते. रिझवानने निकटवर्तीय असलेल्या टॉवलवालाकडून पैशाची मागणी करू नकोस, अशी धमकी त्याने तक्रारदाराला म्हणजेच टॉवलवालाच्या पार्टनरला दिली. १३ आणि १६ जूनला वधरियला आलेले हे धमकीचे दूरध्वनी त्याने दूरध्वनी रेकॉर्ड करून या तिघांविरोधात मुंबई पोलिसांना तक्रार दाखल केली. त्यावेळी गुन्हा दाखल करून दुबईवरून परतल्यानंतर अहमद अफ्रोजला अटक करण्यात होती. अहमदला मुंबई विमानतळावरअटक झाल्याची खबर डि कंपनीला लागताच रिजवान घाबरला होता. पोलीस कधीही अटक करणार या भीतीने 18 जुलैला रात्री तो मिळेल त्या विमानाने दुबईला पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी वेळीच रिजवानला बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमArrestअटकAirportविमानतळMCOCA ACTमकोका कायदा