'Mcoca' on Parveen Tariq and Maharaj, aids of don ejaz Lakdawala | परवीन तारीक व महाराज यांच्यावर ‘मोक्का’

परवीन तारीक व महाराज यांच्यावर ‘मोक्का’

ठळक मुद्दे गॅंगस्टर एजाज लकडावाल याच्यासाठी काम करीत असलेल्या या दोघाकडून अनेक महत्वपुर्ण माहिती पुढे येत आहेधमक्या व खंडणी उकळण्यात आलेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

मुंबई : खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या गॅगस्टर परवीन तारीक व सलीम महाराज यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का)अतर्गंत कारवाई केली आहे. दोघेजण गुन्हे शाखेच्या ताब्यात असून ड्रायफुट विकेत्याला एक कोटीच्या खंडणीसाठी दाखल केलेल्य गुन्ह्यातर्गंत ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


गॅंगस्टर एजाज लकडावाल याच्यासाठी काम करीत असलेल्या या दोघाकडून अनेक महत्वपुर्ण माहिती पुढे येत आहे. व्यापारी, विक्रेत्यांना लकडावालाच्या नावे फोन करुन धमकी देत खंडणी गोळा करीत असत. त्यामुळे ‘मोक्का’चे कलम लावण्यात आले आहे. त्यांच्याकडून धमक्या व खंडणी उकळण्यात आलेल्या नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
 

English summary :
Mcoca Act on tariq parveen and maharaj, duo aids of don ejaz lakdawala

Web Title: 'Mcoca' on Parveen Tariq and Maharaj, aids of don ejaz Lakdawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.