शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

महापौर गोळीबार प्रकरण : वर्ष झाले, आरोपी अद्याप सापडेना, चौकशीचा आलेख गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 9:53 PM

Mayor's firing case : दोन लाखांवर मोबाईलचे कॉॅल डिटेल्स तपासले, २०० वर संशयीतांची प्रत्यक्ष चौकशी

ठळक मुद्दे१२५ जास्त जणांचे बयाण नोंदविले, पुण्या-मुंबईतील एक्स्पर्टर्सचीही मदत घेतली

नरेश डोंगरेनागपूर - सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या आणि राजकीय वातावरण तप्त करणाऱ्या महापौर संदीप जोशी गोळीबार प्रकरणाचा तपास थंडगार झाला की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. १२ महिने झाले तरी तपास यंत्रणेला गोळीबाराचा गुंता सोडविण्यात यश आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणातील तपास करणाऱ्या सीआयडी अधिकाऱ्याची बदली झाल्याने गोळीबाराचा तपास पुन्हा एका नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

१७ डिसेंबर २०१९ ला ही गोळीबाराची घटना घडली होती. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे महापाैर जोशी त्यांचे कुटुंबीय आणि काही मित्रांसह नागपूरच्या आऊटर रिंग रोडवरील रसरंजन धाब्यावर जेवायला गेले होते. जेवण करून दोन मित्रासह कारमध्ये बसून येत असताना एम्प्रेस पॅलेसजवळ मागून बाईकवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी जोशी यांच्या फॉर्च्यूनर कारवर ३ गोळ्या झाडल्या. एक गोळी जोशी यांच्या बाजूच्या काचेतून कारच्या आत शिरली. तर दुसरी गोळी कारच्या मागील सीटमध्ये शिरली. तिसरी गोळी कारच्या मागच्या बाजूला लागली. कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि राज्य सरकारसोबतच सुरक्षा यंत्रणेचा संपूर्ण फौजफाटा नागपुरात असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची विस्तृत माहिती घेताना गोळीबार करणारांना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश दिले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, गन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी स्वता सूक्ष्म नजर ठेवून हल्लेखोरांना शोधण्यासाठी प्रयत्न केले.सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल दोन लाख मोबाईल कॉल्सची तपासणी केली. २०० पेक्षा जास्त गुन्हेगारांना विचारपूस केली. महापालिका, जोशी यांचे निवासस्थान ते घटनास्थळ परिसर अशा ठिकठिकाणच्या शेकडो सीसीटीव्हीचे फुटेजही तपासले. या घटनेपूर्वी जोशी यांना १२ दिवसात पत्राच्या माध्यमातून दोन धमक्या मिळाल्या होत्या. ते पत्र टाकणाऱ्या संशयीतांचीही पोलिसांनी कसून तपासणी केली. चौकशीच्या या धांडोळ्यात पोलिसांच्या हाती काही चक्रावून टाकणारे पैलूही लागले. मात्र, ते उघड करण्यासारखे नव्हते. या पार्श्वभूमीवर, जुलै २०१९ मध्ये हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.१२ महिने झाले, चौकशी सुरूचसीआयडीचे स्थानिक युनिट गेल्या पाच महिन्यांपासून तपास करीत आहेत. या दरम्यान, तपास अधिकारी मोहिते यांची बाहेरगावी बदली झाल्याने आता हा तपास सूर्यवंशी नामक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.दोन दिवसांनंतर या गोळीबाराला १ वर्ष पूर्ण होईल. आजपर्यंत या प्रकरणातील आरोपीचा छडा लागलेला नाही. तपासाचे स्टेटस काय आहे, ते जाणून घेण्यासाठी  लोकमतने सीआयडीचे अतिरक्त महासंचालक अतुल कुळकर्णी यांच्याकडे संपर्क साधला. मात्र, वैद्यकीय कारणांमुळे ते बोलू शकले नाही. तर, सीआयडी एसपी शिवणकर यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी या संबंधाने बोलण्याचे टाळले.

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिसnagpurनागपूरMayorमहापौर