जैसी करनी वैसी भरनी! पतीला तुरूंगात पाठवण्यासाठी महिलेने प्रियकरासोबत केला प्लॅन, पण तिच्यावरच उलटला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 17:15 IST2021-07-05T17:14:09+5:302021-07-05T17:15:18+5:30
अलीगढच्या खैरमध्ये राहणारी तरूणी नोएडामध्ये नोकरी करते. नोकरी करताना तिचं विकास नावाच्या तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं.

जैसी करनी वैसी भरनी! पतीला तुरूंगात पाठवण्यासाठी महिलेने प्रियकरासोबत केला प्लॅन, पण तिच्यावरच उलटला...
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात लग्नात आनंदी नसलेल्या एका तरूणीने पतीपासून पिच्छा सोडवण्यासाठी प्रियकरासोबत मिळून त्याच्या विरोधात असा काही प्लॅन केला की वाचून तुम्ही हैराण व्हाल. पतीपासून पिच्छा सोडवण्यासाठी पत्नीने त्याला तुरूंगात पाठवण्याचा प्लॅन केला. मात्र, तिच्याच मोबाइलमधून पोलिसांसमोर तिच्या प्लॅनचा खुलासा झाला आणि तिची पोलखोल झाली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अलीगढच्या खैरमध्ये राहणारी तरूणी नोएडामध्ये नोकरी करते. नोकरी करताना तिचं विकास नावाच्या तरूणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. यादरम्यान तिचं लग्न कोसीकला येथे राहणाऱ्या एका तरूणासोबत झालं. त्यामुळे त्याच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी तिने प्रियकराच्या मदतीने पतीच्या कारमध्ये एक बेकायदेशीर पिस्तुल ठेवलं. त्यावरून त्याला तुरूंगात पाठवण्याचा प्लॅन होता. मात्र, तिचा प्लॅन तिच्यावरच पलटला. तरूणीच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आणि तिचीही तुरूंगात रवानगी होऊ शकते. (हे पण वाचा : धक्कादायक! एक्स गर्लफ्रन्डवर त्याने चाकूने केले ४७ वार, जीव जाईपर्यंत व्हिडीओ करत राहिला रेकॉर्ड)
पोलिसांना कसा आला संशय?
कोसीकला पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रमोद पवार यांनी सांगितलं की, 'रविवारी एका अज्ञा व्यक्तीने फोन करत पोलिसांनी सूचना दिली की, अमूक अमूक नंबरच्या कारमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत कारमद्ये एक बेकायदेशीर पिस्तुल घेऊन जात आहे. पोलिसांनी तरूणीच्या पतीला रोखलं आणि त्याची झडती घेतली'.
ते म्हणाले की, 'त्या कारची झडती घेतल्यावर लायसेन्स नसलेली एक पिस्तुल आढळून आली. पोलिसांनी पती-पत्नीला पिस्तुलाबाबत विचारलं तर दोघांनीही त्यांना काही माहीत नसल्याचं सांगितलं. तरूणीच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिचा मोबाइल चेक केला तर त्यात पोलिसांनी तक्रारदार विकासचा फोन नंबर दिसला. काही वेळापूर्वीच त्याचा फोन येऊन गेला होता. तिला त्याचे अनेकदा फोन आल्याचेही पोलिसांना दिसलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यावर साऱ्या प्रकरणाचा खुलासा झाला'.
पवार म्हणाले की, विकास विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच हा प्लॅन करणारी त्याची प्रेयसी आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या पुतण्या काशी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.