मास्तर घरी यायचा ट्युशन घ्यायला, अल्पवयीन मुलीवर जडलं प्रेम; नंतर केले अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 21:18 IST2022-03-03T21:14:13+5:302022-03-03T21:18:00+5:30
Kidnapping Case : राजेशने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जवळपास 13 दिवसांपासून गायब केले आहे.

मास्तर घरी यायचा ट्युशन घ्यायला, अल्पवयीन मुलीवर जडलं प्रेम; नंतर केले अपहरण
खैरा (जमुई) : पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचे गावातून लग्नाच्या उद्देशाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज केला असून गावातीलच राजेश कुमारवर आरोप केले आहेत.
अर्जात वडिलांनी म्हटले आहे की, वयाच्या १७ व्या वर्षी त्यांच्या अल्पवयीन मुलीला गावातील राजेश कुमार ट्यूशन शिकवण्यासाठी घरी यायची. राजेशने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जवळपास 13 दिवसांपासून गायब केले आहे. जेव्हा आम्ही राजेशच्या आई-वडिलांकडे तक्रार करायला गेलो असता, येईल परत असं मोगम उत्तर दिले. काही दिवस गेल्यानंतर मी इतरांसह राजेशच्या घरी गेलो असता, त्याच्या आई-वडिलांनी त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलीच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे. एसएचओ सिद्धेश्वर पासवान यांनी सांगितले की, अर्जाच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.