शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; नागरिकांमध्ये भीती व चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:58 IST

दररोज किमान तीन ते चार वाहनचोरीच्या घटना; पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न उपस्थित 

पिंपरीत वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, चोरांच्या मुसक्या आवळणार कधी असा प्रश्न उपस्थित पिंपरी  उद्योगनगरीतील वाहनचोरींच्या रोज नवीन घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भय व चिंता पसरली आहे. दररोज किमान तीन ते चार घटना वाहनचोरीच्या असल्याने पोलीस वाहनचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. दिवसाढवळया बाजारपेठा, सोसायटी, उद्याने, मंदिरे, यांच्यासमोर लावलेली वाहने चोरी होत असल्याने दुचाकी आणि चारचाकीचालक चांगलेच धास्तावले आहेत. बुधवारी शहरात तीन दुचाकी चोरीला गेल्याने अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       एका कार शो रुम समोरुन बुलेट गाडी चोरीला गेल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शशिकांत अरुण चोपडे (वय ३१, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची बुलेट एका कार शो रुमच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे.

दुसरी घटना भोसरी येथे घडली असून त्याप्रकरणी संतोष श्यामबिहारी शर्मा (वय ४२, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची एका कंपनीची दुचाकी लॉकक रुन भोसरीतील पूलाखाली पार्किंग केली होती. कुण्या एका अज्ञात चोरट्याने लॉक तोडून ती मोटारसायकल पळवल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

२३ ते २४ ऑगस्ट दरम्यान सकाळी अकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे याठिकाणाहून फिर्यादी जितेंद्र चिलाजी मराठे (वय ३४, रा. वराळे, मावळ) यांची दुचाकी चोरीला गेली आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेले असताना तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल समोर लॉक करुन पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली.

वाहनचोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचोऱ्या करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते संकट यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाले असताना दुसरीकडे सततच्या चोरीच्या घटनांनी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचोऱ्या करणारी टोळी शहरातील आहे की यात परराज्यातून आलेल्या व्यक्तींचा हात आहे, दररोज चारपेक्षा अधिक वाहने चोरीला जात असताना पोलिसांकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई केली गेली नसल्याचे समोर आले आहे. केवळ दुचाकीच नव्हे तर चोरीला जाण्यात चारचाकींची संख्याही अधिक आहे.

* वाहनचोर आहेत अधिक  ‘स्मार्ट’ज्याचे वाहन चोरायचे त्याच्यावर पाळत ठेऊन दोन ते तीन दिवसांनी वाहनचोरी होत असल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंतच्या घटनांमधून दिसून येते. विशेष म्हणजे दुचाकी लॉक केली असतानाही मोठ्या शिताफीने त्याचे लॉक तोडून दुचाकी लांबविण्याचे प्रमाण वाढले आहे. चारचाकी वाहनांना सेन्सॉर अलर्ट यंत्रणा असूनही ती ब्रेक करण्यात चोरटे अधिक ‘स्मार्ट’ झाले आहेत. अत्याधुनिक साधने, अद्यावत यंत्रणा याच्या साहयाने याप्रकारच्या चो-या शिताफीने केल्या जात आहेत.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerदुचाकीfour wheelerफोर व्हीलरPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर