स्वयंपाक करता येत नसल्याने विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 19:31 IST2019-09-19T19:30:54+5:302019-09-19T19:31:47+5:30
'तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, असे म्हणत फिर्यादीला वारंवार मारहाण केली.

स्वयंपाक करता येत नसल्याने विवाहितेचा छळ
पिंपरी : स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. तसेच लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेला वारंवार मारहाण केली. ही घटना २५ ऑक्टोबर २०१५ ते १८ सप्टेंबर २०१९ या कालावधीत चिखली येथे घडली.
याप्रकरणी २४ वर्षीय पीडित विवाहितीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती दिनेश हरिभाऊ उमरे, सासू भीलाबाई हरिभाऊ उमरे (रा. बेजगाव, नाशिक) अमित उमरे, मंगल बोडके, संगीता घुगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी असताना २५ ऑक्टोबर २०१५ पासून सासरच्या मंडळींनी वारंवार त्यांचा छळ केला. लग्नामध्ये ठरल्याप्रमाणे मानपान दिला नाही म्हणून वारंवार अपमान केला. तसेच पतीने 'तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, तुझी गरज नाही, असे म्हणत फिर्यादीला वारंवार मारहाण केली. घरामध्ये रेशन न भरता त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितीने गुन्हा दाखल केला असून, चिखली पोलीस तपास करत आहेत.