दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 15:28 IST2019-12-27T15:27:30+5:302019-12-27T15:28:23+5:30

दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस..

married women tortured for death of two children | दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ

दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ

ठळक मुद्देयाप्रकरणी 35 वर्षीय पीडित विवाहितने भोसरी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : लग्नात संसारोपयोगी वस्तूंऐवजी दोन लाख रुपये का आणले नाहीस, ते घेऊन ये नाहीतर घरात राहु नकोस असे म्हणून विवाहितेला मारहाण केली. जन्मताच दोन मुले मरण पावल्याच्या कारणावरून महिलेचा छळ करून तिचे वापरायचे व अंगावरील कपडे काढून घेतले. दि. 2 डिसेंबर 2001 ते 19 नोव्हेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी 35 वर्षीय पीडित विवाहितने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासू करवंदा शिंदे (वय 67), जाऊ सुनीता सुधीर शिंदे (वय 30), दीर सुधीर शिंदे (वय 37, रा. वैदुवारी, हडपसर), नणंद उर्मिला राजेंद्र गवळी (रा. लोहगाव, कलवड वस्ती, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात संसारोपयोगी वस्तू का आणल्या त्याबदल्यात दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. दोन मुले जन्मताच मरण पावली. या कारणावरून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी यांचे वापरते व अंगावरचे कपडे काढून घेतले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: married women tortured for death of two children