दारुसाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 18:52 IST2019-04-22T18:51:20+5:302019-04-22T18:52:20+5:30

आरोपीने विवाहितेला माहेराहून आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला होता.

married women harassment for money | दारुसाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

दारुसाठी माहेराहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

पिंपरी : रिक्षा घेण्यासाठी, तसेच दारू पिण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुहास सुरेश बोराटे (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिक्षा घेण्यासाठी व दारू पिण्यासह रोजच्या खचार्साठी आरोपीने विवाहितेला माहेराहून आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. मात्र, विवाहितेने माहेराहून पैसे न आणल्याने आरोपी पतीने विवाहितेला वारंवार शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वारंवार होणाºया शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पतीवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: married women harassment for money