आधी 'Love', आता 'Hate'! तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाही; विवाहितेच्या पोटात लाथा मारून गर्भपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:40 IST2025-03-10T19:39:44+5:302025-03-10T19:40:56+5:30
तिघांना दिली एन्काउंटरची धमकी, पतीसह नऊ जणांविरोधात अंबाजोगाईत गुन्हा दाखल

आधी 'Love', आता 'Hate'! तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाही; विवाहितेच्या पोटात लाथा मारून गर्भपात
बीड - अंबाजोगाईच्या तरुणीने सोलापूरच्या तरुणासोबत 'लव्ह मॅरेज' केले. परंतु पहिल्या वर्षातच तिची 'जात' काढून छळ सुरू झाला. तिच्या पोटात लाथा मारून गर्भपात केला. त्यानंतर नातेवाइकांनी विवाहितेसह तिचा मुलगा आणि वडिलांना एन्काउंटर करण्याची धमकी दिली. सुरुवातीला 'लव्ह' करणारे हे जोडपे आता एकमेकांना 'हेट' करत आहेत. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले असून, पतीसह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या अंबाजोगाईची ही तरूण सोलापूरच्या युवकाच्या प्रेमात पडली. दोघांनी एप्रिल २०१७ मध्ये आंतरजातीय विवाह केला. लग्नानंतर युवती गर्भवती राहिली. सोनोग्राफी केल्यावर तिळे असल्याचे समजले. त्यानंतर सासू-सासऱ्यांसह इतरांनी गर्भपात कर आणि तिला घटस्पोट दे. तिचा सून म्हणून आम्ही स्वीकार करणार नाहीत. तू आपल्या जातीच्या मुलीशी लग्न कर, तू आमचा एककुलता एक मुलगा असल्याने तुला आमची प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटणार नाही असं युवकाला सांगितले.
गर्भपात केला नाहीस तर तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भेटणार नाही. तुला हिस्सा पाहिजे असेल तर तू तुझ्या पत्नीला हाकलून दे असेही म्हणाले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत गर्भवती युवतीच्या पोटात लाथा मारल्या, यात युवतीला वेगळी भाड्याने खोली करून दिली. दरम्यानच्या काळात तिला एक मुलगा झाला. परंतु तिचा छळ थांबला नाही. त्यानंतर आणखी छळ सुरू झाला. तुला नांदायचे असेल तर तुझे आई वडिलांकडून २५ तोळे सोने व २५ लाख रुपये रोख घेऊन ये नाहीतर मी तुला नांदवणार नाही, असे म्हणून मला मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असा आरोप युवतीने केला. युवतीच्या अगावरील सर्व दागिनेही विक्री केले.
दरम्यान, २० ऑगस्ट २०२४ रोजी युवती आणि तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. त्यानंतरही समेट न झाल्याने युवतीने अखेर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानंतर नऊजणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाहीत
२ एप्रिल २०२४ रोजी मुलाच्या कस्टडीसाठी युवती, युवक आणि तिच्या सासरचे लोक अंबाजोगाईला आले होते. युवती ही झेरॉक्स काढायला जात असताना युवकाने थांबविले व हात पिरगाळला. युवकाची बहीण तेथे आली आणि तुझ्यासारखे वेगळ्या जातीचे कधीच घरात घेणार नाही. तुझ्या हातचा स्वयंपाक खाणार नाहीत व तू काहीही हुंडा घेऊन आली नाहीस असं म्हणत शिवीगाळ केली. तर तिच्या पतीने एन्काउंटर करण्याची धमकी दिली.