विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:10 IST2018-08-14T19:09:48+5:302018-08-14T19:10:32+5:30
मानसिक व शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली.

विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी : मानसिक व शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली. याप्रकरणी पतीसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रजाक गायकवाड (वय 48, रा. खानापूर फाटा, एमआयडीसी, परभणी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आत्महत्या केलेल्या महिलेचा पती सागर बबन जाधव आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा सागर जाधव (वय 20, रा. ओटास्किम, निगडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.निशा यांचा सागर याच्याशी 2016 मध्ये विवाह झाला. मुलगी झाली तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला जात होता, मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून निशा यांनी २९ जुलै रोजी ओटास्किम निगडी येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.