सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 18:15 IST2021-07-25T18:14:38+5:302021-07-25T18:15:11+5:30
Suicide Case : याप्रकरणी सासरच्या चौघांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांना अटक
औसा (जि. लातूर) : बोरवेलच्या विहिरीची मोटार आणण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेस सतत शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने त्यास कंटाळून तालुक्यातील खुंटेगाव येथील एका विवाहितेने विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सासरच्या चौघांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडील नातेवाईंकांकडे एका कार्यक्रमाला गेले होते. ही संधी साधून शेजारचे चार तरुण आले... #CrimeNewshttps://t.co/tGusS8FCme
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021