फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: June 30, 2023 22:50 IST2023-06-30T22:49:45+5:302023-06-30T22:50:21+5:30
आराेपीला अटक : लातुरात गुन्हा दाखल

फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल
लातूर : तुझ्यासह मुलीचे फाेटाे, व्हिडीओ साेशल मीडियात व्हायरल करताे, अशी धमकी देत, अंबाजाेगाई येथील एका महिलेवर लातुरात अत्याचार करण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी आराेपीला अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई शहरातील गवळीपुरा भागात राहणाऱ्या एका इसमाने एका विवाहितेचे आणि तिच्या मुलीचे शाॅर्ट फिल्म बनविण्यासाठी म्हणून अनेक फाेटाे काढले आणि व्हिडीओ तयार केले हाेते. मात्र, ती विवाहिता आणि तिची मुलगी शाॅर्ट फिल्ममध्ये काम करण्यास नकार दिल्याने, आपले जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तुझे आणि तुझ्या मुलीचे फाेटाे, व्हिडीओ साेशल मीडियात व्हायरल करताे, अशी धमकी देत, त्या आराेपीने पीडित विवाहितेला वेळाेवेळी लातुरात आणून एका लाॅजवर अनेक वेळा अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पीडित विवाहितेच्या जबाबावरून गांधी चाैक पाेलिस ठाण्यात कलम ३७६ (२) (एम) आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिली.