लव्ह मॅरेज, विश्वासघात अन् कलम ४९८ चा गैरवापर...; विवाहित युवकाने उचललं धक्कादायक पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 09:34 IST2025-12-10T09:34:08+5:302025-12-10T09:34:31+5:30
या व्हिडिओत राहुलने त्याच्या सासऱ्याची मानसिक स्थिती ठीक नाही. सासूने पत्नीला भडकावून पतीचा नंबर ब्लॉक करायला लावला असं राहुलने सांगितले

लव्ह मॅरेज, विश्वासघात अन् कलम ४९८ चा गैरवापर...; विवाहित युवकाने उचललं धक्कादायक पाऊल
वाराणसी - उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका युवकाने पत्नीकडून झालेला विश्वासघात अन् मुलांपासून विरहामुळे आत्मघातकी पाऊल उचलले आहे. युवकाने राहत्या घरात गळफास घेत स्वत:ला संपवले. हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी जवळपास ७.२९ मिनिटाचा त्याने व्हिडिओ बनवला. ज्यात त्याने पत्नीवर गंभीर आरोप करत तिचा बॉयफ्रेंड आणि मुलापासून दूर ठेवल्याचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय कामाचा ताण आणि कर्जात बुडाल्यामुळे जगणे कठीण असल्याचं बोलला आहे.
वाराणसीच्या बनकट गावांत ३० वर्षीय राहुल मिश्राने घरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. मृतकाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल मिश्राने ५ वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केले होते. पोलिसांच्या तपासात राहुलच्या मोबाईलवर एक व्हिडिओ सापडला. जो ७ मिनिटे २९ सेकंदाचा होता. हा व्हिडिओ आत्महत्येपूर्वीचा होता. त्यात राहुलने पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड शुभमबाबत सांगितले. पत्नीने कसा विश्वासघात केला. वारंवार सांगूनही ती शुभमच्या संपर्कात राहिली असा आरोप युवकाने केला. त्याशिवाय मुलापासून ती दूर ठेवायची. राहुलला भेटू दिले जात नव्हते असंही समोर आले.
या व्हिडिओत राहुलने त्याच्या सासऱ्याची मानसिक स्थिती ठीक नाही. सासूने पत्नीला भडकावून पतीचा नंबर ब्लॉक करायला लावला असं राहुलने सांगितले. राहुलने व्हिडिओत वारंवार मी माझी पत्नी आणि मुलावर खूप प्रेम करतो परंतु आता मला हा विरह सहन होत नसल्याचे म्हटलं. त्यामुळे राहुलने हे धक्कादायक पाऊल उचलले. मला मरायचे नाही, परंतु माझ्याकडे कुठलाही मार्ग नाही. कारण माझ्यावर कर्जाचा बोझा आणि कामाचा ताणही आहे असं राहुलने व्हिडिओत सांगितले.
दरम्यान, या व्हिडिओतून राहुलने पुरुषांच्या अधिकारांबाबत भाष्य केले. पत्नीने पतीविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी देत त्याला त्रास दिला. परंतु तरीही राहुलने पत्नीचा स्वीकार केला. पुरुषांचे कुठेही ऐकले जात नाही. कलम ४९८ मध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे असंही राहुलने व्हिडिओत म्हटलं आहे.