अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्न; शिक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:23 IST2023-11-25T08:22:51+5:302023-11-25T08:23:18+5:30

शिक्षक आधीच दोन मुलींचा बाप आहे. त्याची पत्नी सात वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे.

Marriage to a minor student; Teacher arrested | अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्न; शिक्षकाला अटक

अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्न; शिक्षकाला अटक

आंध्र प्रदेश : १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी लग्न करून पती-पत्नीसारखे संबंध ठेवणाऱ्या एका ४६ वर्षीय शिक्षकाला शुक्रवारी आंध्र प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. आरोपी शिक्षक आधीच दोन मुलींचा बाप आहे. त्याची पत्नी सात वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे.

गुरुवारी पोलिसांनी गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम जवळील यंदगानी जिल्हा परिषद हायस्कूलचा हिंदी शिक्षक के. सोमराजू याला प्रेमाच्या बहाण्याने तरुणीला फूस लावून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून ‘ लग्न ’ केल्याप्रकरणी अटक केली.

मुलीशी फसवणूक करून लग्न केल्यानंतर सोमराजूने तिला काही दिवस जबरदस्तीने ठेवले आणि पती-पत्नीसारखे संबंधही ठेवले. त्यानंतर मुलगी आरोपी शिक्षकाच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि यंदागंडी गावात तिच्या घरी परतत तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

Web Title: Marriage to a minor student; Teacher arrested