लग्नात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 22:22 IST2019-12-19T22:20:30+5:302019-12-19T22:22:02+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस तपास करत असून दोघाविरोधात गुन्हा केला आहे.

Marriage of a minor through a minor dispute in marriage; Filed FIR | लग्नात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; गुन्हा दाखल

लग्नात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; गुन्हा दाखल

ठळक मुद्देकिरकोळ वादातून दोघांनी रवी शिंदे (२५) यांचा गळा आवळून खून केला. उल्हासनगर कॅम्प नं 2 येथील मोनिका हॉल मध्ये डोंबिवलीतील मंजुळे कुटुंबाचे लग्न सोहळा होता.

उल्हासनगर - शहरातील मोनिका हॉल मधील लग्न सोहळ्यादरम्यान किरकोळ वादातून दोघांनी रवी शिंदे (२५) यांचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस तपास करत असून दोघाविरोधात गुन्हा केला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं 2 येथील मोनिका हॉल मध्ये डोंबिवलीतील मंजुळे कुटुंबाचे लग्न सोहळा होता. लग्न सोहळ्याला रवी शिंदे आला होता. लग्न संपन्न होण्यापूर्वी रवी शिंदे यांच्या ओळखीच्या सोनल शिंदे व त्याच्या मित्राने त्याच्या डोक्यावर टपली मारून गंमत केली. याचा राग आल्याने लग्न हॉल मध्येच त्यांच्यात वाद झाला होता. लग्न सोहळा संपन्न झाल्यावर सोनल शिंदे व त्याच्या साथीदाराने रवी शिंदे याला दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान लग्न हॉलच्या लिफ़्ट जवळ नेऊन रागात गळा आवळून खून केला. रवी मुत झाल्याचे लक्षात आल्यावर तेथून त्यांनी पळ काढला. असे पोलिसांचे म्हणणे आहे. रवी शिंदे यांच्या खुनाने लग्न सोहळ्यावर अवकळा पसरली. याप्रकारची माहिती मिळाल्यावर उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मुतदेह उत्तरतपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला.

उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. जी. जावळे यांनी पुढील  तपास सुरू केला असून फरार झालेले सोनल शिंदे व त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. मुत रवी शिंदे यांच्या नातेवाईकांनी मध्यवर्ती रुग्णालयात गर्दी केली असून आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक पाठविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांनी दिली आहे.

Web Title: Marriage of a minor through a minor dispute in marriage; Filed FIR