विवाहितेचा खून, पतीसह सासू, सासरा व दिरावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 20:29 IST2018-09-17T20:28:54+5:302018-09-17T20:29:09+5:30

शिवे येथील घटना, खून करून मृतदेह फेकला भामा आसखेड धरणाच्या पाण्यात 

Marriage of husband, husband and mother-in-law, father-in-law and dowry | विवाहितेचा खून, पतीसह सासू, सासरा व दिरावर गुन्हा दाखल 

विवाहितेचा खून, पतीसह सासू, सासरा व दिरावर गुन्हा दाखल 

चाकण - धारदार हत्याराने गळ्यावर वार करून २५ वर्षीय विवाहितेचा खून करून मृतदेह भामा आसखेडच्या फेकून दिल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरा व दिर असा चार जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना चाकणच्या पश्चिम पट्ट्यातील शिवे गावात रविवारी ( दि. १६ ) सकाळी घडली असून खुनाचे कारण अद्याप समजले नाही. दर्शना प्रकाश कारके ( वय २५, रा.शिवे, ता.खेड ) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दर्शनाची आई सुमन लहू शिवेकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून दर्शनाचा पती प्रकाश कारके, सासरा रबाजी कारके, सासू बायाडाबाई कारके, दीर संतोष कारके यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शनाचा मृतदेह भामा आसखेड धरणाच्या पाण्यात आढळला होता. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Marriage of husband, husband and mother-in-law, father-in-law and dowry