विवाहितेने सासरच्या मंडळींवर केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:15 IST2019-05-13T16:12:51+5:302019-05-13T16:15:41+5:30

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. 

Marriage has been filed on the father-in-law's case | विवाहितेने सासरच्या मंडळींवर केला गुन्हा दाखल

विवाहितेने सासरच्या मंडळींवर केला गुन्हा दाखल

ठळक मुद्दे२६ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत सासरच्या मंडळींनी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी सांगितलं. मधूलिका यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

नालासोपारा - भाईंदर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडाबळी, मारहाण आणि शिवीगाळ केल्याबद्दल अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पूर्वेकडील ९० फुटी रोडवरील रिद्धी पॅलेस मधील रूम नंबर जी/१०२ मध्ये राहणारी मधूलिका किसन संतोकी (२४) हिचे विरार पश्चिमेकडील डी मार्ट जवळील गोंड क्रेशट ३६९ मधील रूम नंबर सी/४०२ मध्ये राहणाऱ्या किसन वसंत संतोकी (२७) याच्यासोबत लग्न झाले होते. २६ एप्रिल २०१८ ते आजपर्यंत सासरच्या मंडळींनी माहेरून ४ लाख रुपये आणण्यासाठी सांगितलं. त्यामुळे, पती किसन वसंत संतोकी, सासरे वसंत संतोकी, सासू शारदा वसंत संतोकी, रिंकल आकाश लिखिया यांच्या विरोधात शनिवारी मधूलिका यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Marriage has been filed on the father-in-law's case