शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:40 PM

Crime News : अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या पोखरणमध्ये फसवणुकीची एक अजब घटना समोर आली आहे. अवघ्या सात दिवसांत एक नवरी पैसे आणि दागिने घेऊन पसार झाल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच ही घटना घडल्याने नवरी जोमात आणि नवरदेव कोमात असंचं म्हणावं लागेल. यामुळे नवरदेवाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. लग्नानंतर नववधूने पतीसोबत शरीरसंबंध ठेवायलाही नकार लग्नाच्या आठव्या दिवशी तब्येत बिघडल्याचा बहाणा करत ती घरातून पसार झाली. तसेच हे लग्न जमवणारा मध्यस्थी म्हणून असलेला व्यक्ती देखील तेव्हापासून गायब आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पोखरणमध्ये राहणाऱ्या बाबूरामचं शांती नावाच्या एका तरुणीशी लग्न झालं होतं. जगमाल सिंह या मध्यस्थाच्या मदतीनं हे लग्न जमलं होतं आणि मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आर्य मंदिरात हा विवाह पार पडला. त्यानंतर घरी आलेल्या नववधूचं वागणं पाहून बाबूरामलाही थोडा धक्का बसला. तिनेनलग्नानंतर शारीरिक संबंध ठेवायला नकार दिला होता. काहीतरी बहाणा सांगून तिने काही दिवसांनी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. पत्नीच्या इच्छेचा आदर करत बाबूरामनेही ही गोष्ट मान्य केली होती. 

लग्नानंतर आठव्याच दिवशी संसार मोडला

लग्नाच्या आठ दिवसांपर्यंत ते दोघे एकाच घरात राहत होते, मात्र त्यांच्यामध्ये पती-पत्नीसारखे कोणतेही संबंध नव्हते. लग्नाच्या आठव्या दिवशी आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगत शांतीने उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची विनंती केली. मात्र रुग्णालयामध्ये गेलेली शांती पुन्हा घरी आलीच नाही. बाबूरामने तिला खूप वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा फोन बंद येत होता. बाबूराम जेव्हा तिचा शोध घेऊन घरी आला, तेव्हा त्याच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने गायब होते. सर्व संपत्ती लुटून शांतीने पळून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन पसार

पत्नीने फसवणूक केल्याचं समजताच त्याने मध्यस्थ असणाऱ्या जगमाल सिंहला फोन केला. मात्र त्याचा फोनदेखील बंद असल्यामुळे अखेर त्याने पोलिसांत धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मध्यस्थ आणि पत्नी शांती हे एकमेकांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवली आहे. बाबूरामने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, जवळपास सात लाख रोख रक्कम आणि साडे तीन लाखांचं सोनं घेऊन शांती पळून गेल्याचं म्हटलं आहे. पोलीस या दोघांचा सध्या शोध घेत असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी