शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मनोजचा मोबाइल उलगडणार हत्येचे गूढ; पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज 

By पूनम अपराज | Published: October 12, 2018 9:14 PM

मनोजकुमारची आई कलावती (वय ६०) यांनी मनोजला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फोन आला होता. त्याच व्यक्तीने हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई - दादर फुलमार्केटसारख्या गजबजलेल्या परिसरात आज सकाळी  साडे सात वाजताच्या सुमारास मनोजकुमार मौर्य (वय ३५) या  इसमाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपींविरोधात दाखल असून आरोपीचा शोध पोलीस मृत मनोजकुमारच्या मोबाइलच्या आधारे घेत आहेत. त्यामुळे गोळी झाडणारे ते अज्ञात हत्येखोर कोण ? याचा छडा मोबाइलद्वारे लागणार आहे. मनोजकुमारची आई कलावती (वय ६०) यांनी मनोजला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फोन आला होता. त्याच व्यक्तीने हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

कलावती ही आई, पोन्नूरम हे वडील, सात वर्षाच्या सार्थक हा मुलगा व भावनादेवी ही पत्नी असा मोर्या यांच्या पश्चात परिवार आहे. ते दादर पश्चिम येथील फुल मार्केटशेजारीच असलेल्या श्री साईसिद्धी इमारतीत राहते. दादर फूल मार्केटसमोरील म्हात्रे हाऊस या इमारतीच्या समोरील रस्त्यावर  फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची अनोळखी मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी दादर पोलिसांनी हत्या व हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. परळहून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळ्या झाडून दोघेही फरार झाले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोजला व्यापाऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी परळच्या के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. तपासासाठी घटनास्थळाचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. मात्र, मनोजकुमारच्या आईने सकाळी फोन केलेल्या व्यक्तीने मनोजला बोलाविल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा त्या फोन करणाऱ्या व्यक्तीवर संशय असून पोलीस मोबाइलच्या सविस्तर माहितीतून या खुनाचा आरोपी शोधणार आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनFiringगोळीबार