बहिणीच्या मैत्रिणीवर केला रेप, मग भरलं तिच्या भांगेत कुंकू; होणाऱ्या नवऱ्याला फोटो पाठवून तोडलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:09 IST2022-03-03T15:08:23+5:302022-03-03T15:09:09+5:30
Madhya Pradesh Crime News : जेव्हा या मुलींच लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं तेव्हा त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे काही फोटो पाठवून तिचं लग्न मोडलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

बहिणीच्या मैत्रिणीवर केला रेप, मग भरलं तिच्या भांगेत कुंकू; होणाऱ्या नवऱ्याला फोटो पाठवून तोडलं लग्न
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये (Indore) पोलिसांनी एका माथेफिरूला अटक केली आहे. या आरोपीने त्याच्या बहिणीच्या मैत्रिणीवर रेप केला. तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि मग तिला ब्लॅकमेल करत अनेकदा तिच्यावर रेप (Sexual Abuse) केला. जेव्हा या मुलींच लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरलं तेव्हा त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे काही फोटो पाठवून तिचं लग्न मोडलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
इंदुरच्या भंवरकुआ पोलीस स्टेशन भागात पालदामध्ये राहणारी १८ वर्षीय तरूणीने आरोपी कुणाल विरोधात तक्रार दाखल केली. तरूणी आरोपी तरूणाच्या बहिणीची मैत्रीण आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी रेप आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीला अटक केली.
दोन वर्षापासून ब्लॅकमेलिंग
दोन वर्षाआधी तरूणी ११ व्या वर्गात शिकत होती. त्यादरम्यान आरोपी कुणालसोबत तिची ओळख झाली होती. आरोपी तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. तरूणीने सांगितलं की, २१ डिसेंबर २०२० ला दुपारी कुणाल जबरदस्ती तिच्या घरात घुसला होता आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. सोबतच त्याने तिच्या भांगेत कुंकू भरून फोटो काढले होते. त्यानंतर कुणाल सतत तिला ब्लॅकमेल करत होता. फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली त्याने अनेकदा तिच्यासोबत संबंध ठेवले. पीडितीने घाबरून हे कुणाला सांगितलं नाही.
फोटो पाठवून तोडलं लग्न
काही दिवसांपूर्वी तरूणीचं लग्न ठरलं होतं. याची माहिती कुणालला लागली तर तो हे लग्न मोडण्यासाठी तरूणीवर दबाव टाकू लागला होता. जेव्हा तरूणी ऐकली नाही तर त्याने भांगेत कुंकू भरतानाचे फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले. काही फोटो त्याच्या मित्रांनीही व्हायरल केले. त्यानंतर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने फोन करून हे लग्न मोडलं. त्यानंतर वैतागलेली तरूणी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि कुणाल विरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.