सलवारच्या नाड्याने केली पत्नीची केली हत्या, प्रेयसीसोबत 3 तास कारमध्ये घेऊन फिरत होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:52 IST2023-01-02T14:51:51+5:302023-01-02T14:52:57+5:30

Crime News : आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांना भरकटवण्यासाठी सूचना दिली की, चोरी केल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली.

Man plans to live with girlfriend strangles wife to death | सलवारच्या नाड्याने केली पत्नीची केली हत्या, प्रेयसीसोबत 3 तास कारमध्ये घेऊन फिरत होता मृतदेह

सलवारच्या नाड्याने केली पत्नीची केली हत्या, प्रेयसीसोबत 3 तास कारमध्ये घेऊन फिरत होता मृतदेह

Crime News : गाझियाबादच्या जवळ असलेल्या हापूडमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधाचा विरोध करणाऱ्या पत्नीची तिच्या पतीने निर्दयीपणे हत्या केली. नंतर पोलिसांसमोर अशी खोटी कहाणी सांगितली की, आरोपीचा भांडाफोड झाला. 

आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर पोलिसांना भरकटवण्यासाठी सूचना दिली की, चोरी केल्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांचा पतीवर संशय आला. 

गाझियाबादच्या आनंद विहारमध्ये राहणारा विकास हरयाणाच्या भिवाडमधील एका औषध कंपनीमध्ये नोकरी करतो. इथे अनीषा दलाल सुद्धा नोकरी करते. सोबत काम करत असताना दोघांची जवळीक वाढली. त्यांचं अफेअर सुरू झालं. दोन वर्षानी याची माहिती विकासच्या पत्नीला लागली. तेव्हा तिने याचा विरोध केला. विकास आणि त्याची पत्नी सोनिया यांच्यात यावरून चांगला वादही झाला. 

आता विकासने ठरवलं होतं की, सोनियाला मार्गातून दूर करायचं आणि हेच करण्यासाठी त्याने शुक्रवारी पत्नीला सासरी जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसवलं. त्यानंतर गाझियाबादला पोहोचल्यानंतर प्रेयसी अनिषालाही त्याने गाडीत बसवलं. 

हायवेवर त्याने सोनियाचा तिच्याच सलवारच्या नाड्याने गळा आवळला आणि तिची हत्या केली. यानंतर अनिषा आणि विकास मृतदेह घेऊन 3 तास फिरत राहिले. नंतर पोलिसांना सूचना दिली की, त्यांच्यासोबत लूट झाली आणि चोरांनी त्याच्या पत्नीची हत्या केली.

विकासच्या फोन चेक केल्यावर पोलिसांना समजलं की, त्याने गुगलवर 'हत्या कशी करावी' असं सर्च केलं होतं. त्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विष खरेदी करण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच त्याने सर्च केलं होतं की, तो बंदूक कुठून खरेदी करू शकतो. पोलिसांना सध्य दोघांनाही अटक केली आहे. ते पुढील कारवाई करत आहेत.

Web Title: Man plans to live with girlfriend strangles wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.