शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ८०० रुपयांसाठी दगडाने ठेचून केली फिरस्त्याची हत्या; ओळख लपविण्यासाठी आरोपी घालायचा ‘टोपी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:26 IST

खडवली येथील भातसा नदीच्या पात्राजवळ २१ एप्रिलला एका व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला हाेता.  कल्याण तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला

जितेंद्र कालेकरठाणे - नदीत अंघोळीसाठी जाताना जवळ ठेवण्यासाठी दिलेले अवघे ८०० रुपये परत न दिल्याच्या कारणावरून राजेश  प्रभूळकर (४९,  सध्या रा. शिवडी, मुंबई) या फिरस्त्याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील खडवली येथे घडली. या प्रकरणी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई आणि ठाण्यातील तब्बल ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून योगेश राणे (४०, मूळ रा. श्रीवर्धन, रायगड) या सराईत गुन्हेगाराला लोअर परळ  येथून अटक केली. 

कल्याणजवळील ज्युगाव, खडवली येथील भातसा नदीच्या पात्राजवळ २१ एप्रिलला एका व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला हाेता.  कल्याण तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला. आराेपीला शाेधण्याचे आव्हान असल्यामुळे  ठाणे ग्रामीणचे  पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तपासासाठी ७ विशेष पथके नेमली. पथकाने एन. एम. जोशी मार्ग पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते, उपनिरीक्षक महेश कदम  आणि सहायक पाेलिस निरीक्षक नितीन मुदगुन व पथकाने त्याला बेड्या ठाेकल्या.

आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारआरोपी योगेश आणि राजेश हे दोघेही मित्र होते. ते मुंबईत पदपथावर  किंवा पुलाखाली राहायचे आणि मिळेल तिथे केटरिंगचे काम करायचे. २०  एप्रिल रोजी दोघे खडवली येथे नदीवर अंघोळीसाठी  गेले होते. अंघोळीला जाताना योगेशने स्वतःकडील ८०० रुपये राजेशकडे  दिले. अंघोळ झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघताना योगेशने ते पैसे  मागितल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या रागातून योगेशने राजेशची हत्या केली. 

‘बेली’मुळे तपासाला मिळाली दिशातपासादरम्यान घटनास्थळी पाचारण केलेले पोलिस श्वान ‘बेली’ हिने खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा मार्ग दाखवला. याच धाग्यामुळे पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंतच्या ३० ते ३५ रेल्वेस्थानकांच्या परिसरातील सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेजची तसेच इतर भागातील सुमारे १०० फुटेजची बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपी आपली ओळख लपविण्यासाठी कायम टोपी घालत असल्याचे  तपासादरम्यान उघडकीस आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Man murdered for ₹800; accused wore hat to conceal identity.

Web Summary : A homeless man was stoned to death in Khadavli over ₹800. Police arrested a serial offender from Lower Parel after reviewing CCTV footage. The accused and victim were friends working catering jobs. A police dog helped trace the route.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी