पत्नीचं अफेअर असल्याच्या संशयातून पतीने केलं भयंकर कृत्य; तिच्यासह तीन मुलांनाही संपवलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:43 IST2024-01-02T14:42:29+5:302024-01-02T14:43:43+5:30

उमेंद्र हा मागील काही महिन्यांपासून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

Man kills wife and three children on suspicion of extramarital affair | पत्नीचं अफेअर असल्याच्या संशयातून पतीने केलं भयंकर कृत्य; तिच्यासह तीन मुलांनाही संपवलं! 

पत्नीचं अफेअर असल्याच्या संशयातून पतीने केलं भयंकर कृत्य; तिच्यासह तीन मुलांनाही संपवलं! 

Wife Murder Case ( Marathi News ) : पतीने अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीसह आपल्या तीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याची घटना छत्तीसगडमधील बिलासपूर इथं घडली आहे. आज उघडकीस आलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. उमेंद्र केवट असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उमेंद्र केवट हा आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह बिलासपूर जिल्ह्यातील हिर्री या गावी वास्तव्यास होता. उमेंद्र हा मागील काही महिन्यांपासून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वादही होत असायचा. सोमवारी रात्री उमेंद्र केवट आणि त्याच्या पतीचा पुन्हा वाद झाला आणि उमेंद्रने क्रूरपणाचा कळस गाठत आधी पत्नीला गळा दाबून संपवलं आणि नंतर तीन मुलांचीही हत्या केली. 

वडिलांकडून हत्या करण्यात आलेल्या दोन मुलींचं वय पाच वर्ष आणि चार वर्ष होतं, तर मुलगा दोन वर्ष वयाचा होता.

दरम्यान, चार जणांच्या हत्येप्रकरणी आरोपी उमेंद्र केवट याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी दिली आहे. तसंच पोलिसांकडून उमेंद्र केवट याची चौकशी करत याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
 

Web Title: Man kills wife and three children on suspicion of extramarital affair