अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीने वार करून भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 13:52 IST2019-10-03T13:50:39+5:302019-10-03T13:52:51+5:30

पाठलाग करत भावावर केले कुऱ्हाडीने वार

A man kills his brother with an axe due to extra marital affair | अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीने वार करून भावाची हत्या

अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीने वार करून भावाची हत्या

ठळक मुद्दे दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

सिल्लोड : तालुक्यातील चारनेरवाड़ी येथे अनैतिक संबंधातून भावानेच भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले  आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून गुरुवारी सकाळी उघडकीस आली. जगदीश चरावंदे अये मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री चारनेरवाड़ी येथील शेतात जगदीशला त्याच्या भावजई सोबत भावाने नको त्या अवस्थेत पाहीले. यामुळे जगदीशने तेथून पळ काढला. मात्र राग अनावर झाल्याने भावाने कुऱ्हाड घेऊन त्याचा पाठलाग केला. शेतापासून २०० फुट अंतरावर जगदीशला गाठून त्याने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. जगदीशच्या गळ्यावर व मानेवर खोलवर जखम झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. 

गुरुवारी सकाळी याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धावा घेतली. पोलिसांनी अधिक तपास केला असता, हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी भाऊ व भावजई यांना ताब्यात घेतले आहे. भावाने हत्येची कबुली दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

Web Title: A man kills his brother with an axe due to extra marital affair