आधी २ मुलांची दगडाने ठेचून हत्या, मग मृतदेह विहिरीत फेकला, त्यानंतर निर्दयी बापानं जे केलं त्याने धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 10:38 IST2021-05-24T10:36:37+5:302021-05-24T10:38:06+5:30

हा शोध सुरू असताना काही लोकांना लाडगंज येथील केदारेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले.

Man Kills his 2 children, then the body was thrown into a well before Committing Suicide in jhansi | आधी २ मुलांची दगडाने ठेचून हत्या, मग मृतदेह विहिरीत फेकला, त्यानंतर निर्दयी बापानं जे केलं त्याने धक्काच बसला

आधी २ मुलांची दगडाने ठेचून हत्या, मग मृतदेह विहिरीत फेकला, त्यानंतर निर्दयी बापानं जे केलं त्याने धक्काच बसला

झाशी – बुंदेलखंडच्या झाशी जिल्ह्यात रानीपूर येथे कौटुंबिक वादातून एका कुटुंबाच्या आनंदाला ग्रहण लागलं आहे. याठिकाणी एका व्यक्तीने स्वत:च्या दोन चिमुकल्यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. त्यानंतर दोघांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. इतकचं नाही तर यानंतर या व्यक्तीनं स्वत:चा गळा कापून विहीरत उडी घेतली. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत. एकाच कुटुंबातील या तिघांच्या मृत्यूनंतर गावात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाशीच्या रानीपूर येथील रहिवासी रहिशला दारू पिण्याची सवय होती. नशेच्या स्थितीत रहिश त्याच्या पत्नीसोबत वारंवार भांडण करत होता. २२ मे रोजी रहिशचं त्याच्या पत्नीसोबत जोराचं भांडण झालं. हे भांडण शांत झाल्यानंतर रहिश त्याच्या १२ वर्षाचा मुलगा हर्ष आणि ९ वर्षीय अंश यांना कपडे घेण्याच्या निमित्ताने बाजारात घेऊन गेला. संध्याकाळ झाली तरी ते तिघंही परतले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असताना काही लोकांना लाडगंज येथील केदारेश्वर मंदिराजवळील विहिरीच्या ठिकाणी रक्ताचे डाग पाहिले.

काहीतरी विचित्र प्रकार असल्याचं पाहत काहींनी विहिरीत वाकून पाहिलं तर त्यांना रहिश आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. स्थानिकांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या तिघांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासाप्रमाणे कौटुंबिक वादातून रहिशने हे जीवघेणं कृत्य केल्याचा संशय आहे. पहिलं त्याने लहान मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत:चा गळा कापून विहिरीत उडी मारली त्यात त्याचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपासाला सुरूवात केली आहे. सध्या पोलीस कुटुंबाची चौकशी करत आहेत.

Web Title: Man Kills his 2 children, then the body was thrown into a well before Committing Suicide in jhansi

टॅग्स :Policeपोलिस