शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव; मुलगा गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:56 IST

Crime News : वणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबीरीसाठी पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुरली सिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. मुरली सिंह नेहमीप्रमाणे आपल्या घरी जेवत होता. त्यावेळी त्याच्या पत्नीने ताटात कोशिंबीर वाढली नाही. त्यामुळे त्याचा पारा चढला आणि संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला 20 वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे.

आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घरात पाहिलं असता पत्नी आणि मुलगा जखमी अवस्थेत दिसले. त्या दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच महिलेचा मृत्यू झाला होता. तर मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी बाबरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

प्रेम केलं म्हणून दिली अघोरी शिक्षा! मुंडण केलं, चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवलं; घटनेने खळबळ

अनेक भयंकर घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून एका तरुणाला अघोरी शिक्षा केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने गावातील एका मुलीवर केलं म्हणून संतप्त झालेल्या लोकांनी त्याचं जबरदस्तीने मुंडण केलं, गळ्यात चपलांचा हार घातला अन् त्याला गावभर फिरवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जबलपूरमध्ये ही संतापजनक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी जबलपूर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधील दमन खामरिया गावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राज कुमार देहरिया या व्यक्तीने हे आरोप केले असून याबाबत तक्रार दाखल केली आहे. देहरिया याने आपल्या तक्रारीत आपलं जबरदस्तीने मुंडण केलं. साखळीने बांधलं, गळ्यात चपलांचा हार घातला आणि संपूर्ण गावात फिरवलं असल्याचं म्हटलं आहे. गावातल्या एका मुलीवर प्रेम होतं. तिच्याच घरच्यांनी हे सर्व घडवून आणल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तसेच आरोपींनी या घटनेचा एक व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूIndiaभारत