रात्री गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला आला बॉयफ्रेंड; घरच्यांना जाग आली अन् घडलं भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:41 IST2023-11-28T12:35:59+5:302023-11-28T12:41:17+5:30

नरेंद्र गर्लफ्रेंडला भेटत असताना तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि ओळखीच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला.

man goes to meet his girlfriend in sanchore beaten to death by her family | रात्री गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला आला बॉयफ्रेंड; घरच्यांना जाग आली अन् घडलं भयंकर...

फोटो - nbt

कधी कधी प्रेम जीवघेणं ठरतं. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या सांचोर जिल्ह्यातील चितलवाना पोलीस स्टेशन परिसरातून समोर आला आहे. रविवारी सायंकाळी प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक सागर राणा यांनी काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. नरेंद्र धोबी हा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी रात्री गुपचूप तिच्या घरी पोहोचला होता. नरेंद्र गर्लफ्रेंडला भेटत असताना तरुणीच्या कुटुंबीयांनी आणि ओळखीच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. मुलीच्या घरच्यांनी नरेंद्रला पकडून बेदम मारहाण केली. यामुळे तो गंभीर जखमी झाला.

सागर राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या कुटुंबीयांना लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. तक्रार आल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला जाईल. याबाबत पोलीस अधिकारी पन्ना राम यांनी सांगितले की, नरेंद्र धोबी (27) रविवारी संध्याकाळी रनोदर गावात गर्लफ्रेंडला भेटायला गेला होता. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी त्याला मारहाण केली. 

गंभीर अवस्थेत नरेंद्रला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नरेंद्र विवाहित असल्याची माहिती मुलीला नसल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या दोघांमधील प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनाही राग आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 

Web Title: man goes to meet his girlfriend in sanchore beaten to death by her family