बापरे! माथेफिरू पोलीस ठाण्यात घुसला आणि 5 पोलिसांवर केला चाकूने हल्ला केला, स्वतःला भिंतीवर घेतलं आपटून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:04 IST2022-06-23T15:03:33+5:302022-06-23T15:04:14+5:30
Attack on Police : एवढेच नाही तर पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि भिंतीवर डोके आपटण्यास सुरुवात केली.

बापरे! माथेफिरू पोलीस ठाण्यात घुसला आणि 5 पोलिसांवर केला चाकूने हल्ला केला, स्वतःला भिंतीवर घेतलं आपटून
देशाची राजधानी दिल्लीतील शाहदरा सायबर पोलिस स्टेशनमध्ये एका माथेफिरूने 5 पोलिसांवर हल्ला केला, ज्यात पोलीस गंभीर जखमी झाले.जखमींमध्ये 4 दिल्ली पोलिस कर्मचारी आहेत, तर एक होमगार्डचा आहे. माथेफिरूने पोलिसांना चाकूने भोसकले. एवढेच नाही तर पोलिसांवर हल्ला केल्यानंतर स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि भिंतीवर डोके आपटण्यास सुरुवात केली.
सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यावर हल्ल्यानंतर कॉन्स्टेबल सुनीलची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपीने हल्ला केला तेव्हा तो गेटवरच होता आणि माथेफिरूने पोलिसाच्या छातीवर वार केले होते.
रिपोर्टनुसार, आरोपीने किचनमध्ये वापरलेल्या चाकूने हल्ला केला. सायबर पोलिस ठाण्याच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. आरोपीला ताब्यात घेऊन हल्ल्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.