शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:17 IST

शहरात किराणा दुकान होते, तेथे महिला सामान घेण्यासाठी येत असे.

यूपीच्या महोबामध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाने ५५ सेकंदाचा व्हिडीओ बनवला आणि ६ पानांची सुसाईड नोट सोडली. सुसाईड नोटमध्ये महिलेने अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कबराई पोलीस स्टेशन हद्दीतील गांधीनगर भागातील आहे. कुलदीप गुप्ता याने राहत्या घरी गळफास लावून घेतला. घरात मृतदेह लटकल्याची माहिती मिळताच कुटुंबीय पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि झडती घेतली असता खिशातून सुसाईड नोटही सापडली.

सुसाईड नोटनुसार, कुलदीपचे छानिकला गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ती महिला त्याचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत होती. सहा पानी सुसाईड नोटमध्ये तरुणाने म्हटलं आहे की, दोन वर्षांपूर्वी ही महिला त्याच्या किराणा दुकानात ग्राहक म्हणून आली होती. मग हळूहळू ती जवळ आली आणि मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

महिलेने अश्लील व्हिडीओ बनवला आणि नंतर ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात केली, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. महिलेच्या पतीनेही पैसे उकळण्यास सुरुवात केली. किराणा दुकानाचं नुकसान होऊ लागले. यामुळे तो नैराश्यात गेला. महिला आर्थिक व मानसिक छळ करू लागली.

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडीओ बनवला होता जो व्हायरल झाला होता. ५५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये महिलेने छळ केल्याचा आरोप केला आहे. अनेक दिवसांपासून कुलदीप नैराश्यात होता आणि त्याने हे पाऊल उचलल्याचं मृताच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. मृताच्या भावाने सांगितलं की, कबराई शहरात किराणा दुकान होते, तेथे महिला सामान घेण्यासाठी येत असे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश