मोबाइलमुळे झालेल्या वादात मोठ्या भावाची हत्या, मृतदेहाचे केले छोटे-छोटे तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:42 IST2021-08-10T14:40:25+5:302021-08-10T14:42:20+5:30
Man Cut His Elder Brother Into Pieces: आरोपीने 22 दिवस मृतदेहाचे तुकडे घरात लपवले.

मोबाइलमुळे झालेल्या वादात मोठ्या भावाची हत्या, मृतदेहाचे केले छोटे-छोटे तुकडे
सहारनपुर: उत्तर प्रदेशातील सहारनपुरमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने मोबाइलमुळे झालेल्या वादातून मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नाही, तर त्याने हत्येनंतर मृतदेहाचे लहान-लहान तुकडे घरातच जमिनीत पुरले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सहारनपुरच्या गंगोह पोलिस हद्दीतील ढोला गावातील आहे. ईदच्या दिवशी मोठ्या भावाने नवीन मोबाइल घेतला होता. पण, लहान भावाकडून त्या मोबाइलवर चुकीचा पासवर्ड लावण्यात आला. यामुळे दोन्ही भावांमध्ये बाचाबाची झाली. या मोबाइलवरुन झालेल्या वादानंतर लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात फावडा मारला. या मारहाणीत फरमान नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर पोलिस पकडतील या भीतीने घाबरलेल्या आरोपीने मोठ्या भावाचे लहान-लहान तुकडे केले आणि घरातच जमिनीत पुरले.
22 दिवसानंतर झाला खुलासा
हत्येनंतर आरोपीने घरात मृतदेह घरामध्येच पुरला होता. काही दिवसानंतर घरातून शेजाऱ्यांना घाण वास येऊ लागला. याबाबत शेजाऱ्यांनी आरोपीला विचारणा केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरुन गावातील लोकांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी सोमवारी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना घरात येऊन खोदल्यावर त्यांना मृतदेह पुरलेला आढळला.