'प्रेयसीला वैतागून आत्महत्या करत आहे', सुसाइड नोट लिहून तरूणाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:26 IST2022-05-28T14:23:17+5:302022-05-28T15:26:25+5:30
Uttar Pradesh Suicide : मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहितीनुसार कानपूरला राहणारा हा तरूण हिमालयन कंपनी एमआर म्हणून काम करत होता. त्याची ड्युटी बांदा येथे होती.

'प्रेयसीला वैतागून आत्महत्या करत आहे', सुसाइड नोट लिहून तरूणाने स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन
Uttar Pradesh Suicide : उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये (Banda) तरूणाने बेकायदेशीर पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या (Youth Shoot Himself) केली. हे प्रेम प्रकरणातून घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली आहे. तसेच तरूणाने आत्महत्या करण्याआधी फेसबुकवर 'अलविदा' अशी पोस्टही लिहिली होती. मिळालेल्या माहितीनुसार कानपूरला राहणारा हा तरूण हिमालयन कंपनी एमआर म्हणून काम करत होता. त्याची ड्युटी बांदा येथे होती.
ही घटना कटरा मोहल्ल्यातील आहे. असं सांगितलं जात आहे की, इथे त्याचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. सीओ राकेश सिंह म्हणाले की, सुसाइड नोटमध्ये तरूणाने लिहिलं की, 'मी माझ्या प्रेयसीला वैतागलो आहे. त्यामुळे मी माझं जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूला जबाबदार माझी प्रेयसी आहे'. सध्या तरूणाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स चेक केले जात आहेत.
सध्या या गोष्टीचा तपास घेतला जात आहे की, तरूणाने आत्महत्या एकतर्फी प्रेमातून केली की त्याचं खरंच कुणा तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. पोलिसांनी सांगितलं की, तरूण इथे भाड्याच्या घरात राहून काम करत होता. तरूणाच्या कुटुंबियांना घटनेची सूचना देण्यात आली आणि पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल.
डिप्रेशनमध्ये एका तरूणीनेही केली होती आत्महत्या
याआधी बांदामध्ये एका तरूणीने डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या केली होती. मृत तरूणीच्या चेहऱ्यावर पुरळ येत होती. १० वर्षांपासून अनेक डॉक्टरांना दाखवूनही तिची ही समस्या दूर होत नव्हती. याच कारणाने तरूणीचं लग्न तुटलं होतं आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मग अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बिसंडा येथील आहे.