Man beaten for empty pocket with 3 rupees in alipur Delhi | 'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर!

'आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा...' , काही नाही सापडलं तर रागात तरूणाचे ३ रूपये लुटून पळाला चोर!

तुम्ही सिनेमाचे शौकीन असाल तर तुम्ही 'अंदाज अपना अपना' सिनेमा नक्कीच पाहिला असेल. या सिनेमातील शक्ती कपूरची क्राइम मास्टर गोगो ही भूमिका चांगलीच गाजली होती. हे कॅरेक्टर जेव्हाही पडद्यावर येतं तेव्हा एक डायलॉग म्हणतं, 'मोगैंबो का भतीजा हूं, आया हूं तो कुछ तो लूटकर जाऊंगा'. अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. अलीपूरमध्ये एका तरूणाला लुटत असताना काही हाती लागलं नाही म्हणून निराश झालेला चोर त्या तरूणाकडील ३ रूपये लुटून घेऊन गेला. 

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनुसार, मुळचा यूपीतील मैनपुरी येथील राहणारा २२ वर्षीय अर्जुन सिंधु गावात भाड्याने राहतो. येथील एका प्रायव्हेट फॅक्टरीत तो नोकरी करतो. तो रोज प्रमाणे आपल्या सायकलने ड्यूटीला जाण्यासाठी निघाला होता. यावेळी रात्रीचे साधारण ८ वाजले होते. तो जसा दादा भैया मंदिराजवळ पोहोचला तिथे एक तरूण हत्यार घेऊन त्याच्या सायकलसमोर आला.  (हे पण वाचा : देवानेच दिली शिक्षा! मंदिरात चोरी करायला गेलेल्या चोराचे दानपेटीत अडकले हात आणि मग...)

काही कळायच्या आत चोराने त्या तरूणाची सायकल खाली पाडली. अर्जुन खाली पडताच चोराने हत्याराचा धाक दाखवत जे काही आहे ते देण्यास सांगितले. मात्र, अर्जुन जसं म्हणाला की, त्याच्याकडे काहीच नाही तर तो संतापला. चोराने तरूणाला मारहाण केली. नंतर त्याचा गळा दाबला. त्यामुळे अर्जुन घाबरला होता. (हे पण वाचा : वडिलांच्या खात्यातून मुलानेच चोरले ३२ लाख)

चोराने अर्जुनला जीवे मारण्याची धमकी देत त्याला शांतपणे उभं राहण्यास सांगितले. नंतर त्याचे खिसे तपासले. पॅंटच्या एका खिशात चोराला ३ रूपये सापडले. बाकी खिशात काहीच सापडलं नाही. त्यामुळे चोर चांगलाच संतापला. त्याने पुन्हा अर्जुनला बेदम मारहाण केली. आणि त्याच्याकडचे तीन रूपये लुटून पळून गेला. अर्जुन लगेच सायकल घेऊन वेगाने कंपनीकडे गेला. त्यानंतर कंपनीतील त्याचे मित्र त्याला घरी सोडून आले. त्यांनीच पोलिसांना कॉल करून याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
 

Web Title: Man beaten for empty pocket with 3 rupees in alipur Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.