रात्री घराची बेल वाजवून पळणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:21 IST2020-01-15T19:20:18+5:302020-01-15T19:21:20+5:30

सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.

A man arrested who was the bell rang at home in night | रात्री घराची बेल वाजवून पळणारा अटकेत

रात्री घराची बेल वाजवून पळणारा अटकेत

ठळक मुद्देसप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याने अशाच प्रकारे मेहता यांच्या घराची बेल वाजवून पळ काढला होता.प्रेम लालसिंग नेपाळी (३७) असे अटक आरोपीचे नाव आहे. सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे याबाबत जाब विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही.

मुंबई : रात्री उशिराने सराफाच्या घराची बेल वाजवून पळणाऱ्या आरोपीला कांजूरमार्ग पोलिसांनीअटक केली आहे. प्रेम लालसिंग नेपाळी (३७) असे अटक आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.


कांजूरमार्गच्या एका को-ऑप. सोसायटीत राहणारे राकेश मेहता (४३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेहता यांचे याच परिसरात सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री दोनच्या सुमारास नेपाळीने इमारतीत प्रवेश केला आणि मेहता यांच्या दरवाजाची बेल वाजवून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटली. त्याच्याकडे याबाबत जाब विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही.

सप्टेंबर २०१८ मध्येदेखील त्याने अशाच प्रकारे मेहता यांच्या घराची बेल वाजवून पळ काढला होता. त्या वेळीदेखील त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. नशेमध्ये तो हे कृत्य करीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने हा प्रकार पुन्हा केल्याने मेहता यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
त्यानुसार, कांजूर पोलिसांनी नेपाळीला अटक केली आहे. त्याने असे का केले? याबाबत तो काहीही माहिती पोलिसांना देत नसल्याने यामागचे गूढ कायम आहे. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A man arrested who was the bell rang at home in night