शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

प्रेयसीचा ‘गर्भ’ भाडेतत्त्वावर देऊन संसार थाटण्याचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:51 AM

पैसे घेऊन पसार झालेल्या प्रियकराला अटक

मुंबई : एका बावीस वर्षीय तरुणीला तिचा गर्भ भाडेतत्त्वावर देत सरोगेट आई बनण्यास सांगत सुखी संसाराची स्वप्ने दाखवली, मात्र त्यासाठी ती तरुणी ‘अनफिट’ असल्याचे समजताच टोकन रक्कम घेऊन प्रियकर पसार झाला. याप्रकरणी मालाड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तरुणीची सुटका करत तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. तरुणी ही मालाडची राहणारी असून, इन्स्टाग्रामवर तिची मैत्री एका व्यक्तीशी झाली. तिने त्याला नोकरी शोधण्यास सांगितले तेव्हा नवी मुंबईत एका लॅबमध्ये त्याने तिला काम शोधून दिले. यादरम्यान त्या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. दरम्यान, लॅब बंद पडली आणि प्रियकराने पीडितेला हैदराबाद येथील जोडप्यासाठी सरोगेट आई बनण्यास तयार केले. तरुणीने घर सोडताना पुण्यात नोकरीच्या निमित्ताने जात असल्याचे सांगितले. त्यानुसार सीएसएमटी स्टेशनवर दोघे पोहोचले आणि प्रियकराने पीडितेला हैदराबादला जाताना रेश्मा नामक महिलेसोबत राहण्यास सांगितले. रेश्माने तिला हैदराबादमध्ये एका रुग्णालयात नेले. दोन दिवस तिच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या, मात्र अहवालात ती सेरोगसीसाठी फिट नसल्याचे उघड होताच प्रियकर टोकन रक्कम घेऊन पसार झाला. त्यामुळे तिने आईला फोन करत पोलीस ठाण्यात धाव घेण्यास सांगितले. आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आधीच केल्याने मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मुलीची सुटका करत १३ ऑक्टोबर रोजी प्रियकराला अटक केली.