पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडलं, दोघांनाही नग्न करून गावात फिरवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:38 IST2022-06-14T15:37:36+5:302022-06-14T15:38:04+5:30
Chhattisgarh Crime News : असं सांगितलं जात आहे की, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे.

पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडलं, दोघांनाही नग्न करून गावात फिरवलं...
छत्तीसगढमधून (Chhattisgarh Crime News) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला आणि त्याच्या प्रेयसीला नग्न करून पूर्ण गावात फिरवण्यात आलं. ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. असं सांगितलं जात आहे की, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे.
ही घटना कोंडागाव जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरूणाला त्याच्या पत्नी प्रेयसीसोबत एका रूममध्ये रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर महिलेने आरडाओरड करून गावातील लोकांना बोलवलं होतं. त्यानंतर गावातील लोकांनी स्वत:च तरूणाला आणि त्याच्या प्रेयसीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
शिक्षा देण्याआधी विवाहित तरूण आणि त्याच्या प्रेयसीला गावातील लोकांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना लग्न करून गावातून त्यांची धिंड काढण्यात आली. असं सांगितलं जात आहे की, ही घटना शनिवारची आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली.
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 4 लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.