६ वर्षांच्या चिमुरडीवर मामाचा बलात्कार, आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:47 AM2021-09-17T11:47:14+5:302021-09-17T11:55:47+5:30

उल्हासनगरात गुन्हेगारीत वाढ झाली असून गेल्या काही दिवसापासून बलात्काराच्या घटनेने शहर हादरून गेले. शहर पूर्वेत राहणारी ६ वर्षाची चिमुरडी ही आई-वडिलां सोबत राहत होती.

Mama raped 6-year-old Chimurdi, accused remanded in police custody till September 18 | ६ वर्षांच्या चिमुरडीवर मामाचा बलात्कार, आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

६ वर्षांच्या चिमुरडीवर मामाचा बलात्कार, आरोपीला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देउल्हासनगरात गुन्हेगारीत वाढ झाली असून गेल्या काही दिवसापासून बलात्काराच्या घटनेने शहर हादरून गेले. शहर पूर्वेत राहणारी ६ वर्षाची चिमुरडी ही आई-वडिलां सोबत राहत होती.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : आजी-आजोबांच्या घरी खेळण्यासाठी जात असलेल्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर मामाने अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघड झाल्यावर, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी काही तासातच आरोपी ३१ वर्षीय मामाला अटक केली असून न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगरात गुन्हेगारीत वाढ झाली असून गेल्या काही दिवसापासून बलात्काराच्या घटनेने शहर हादरून गेले. शहर पूर्वेत राहणारी ६ वर्षाची चिमुरडी ही आई-वडिलां सोबत राहत होती. वडील कामाला तर आई भाजी विकण्यासाठी गेल्यावर, परिसरात राहणाऱ्या आजी-आजोबाच्या घरी ६ वर्षाची चिमुरडी खेळण्यासाठी जात होती. दरम्यान ३१ वर्षीय मामाची वाईट नजर भासीवर गेली. सोमवारी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी मुलीच्या वागण्यावरून तिच्यावर अत्याचार झाला. ही बाब आईच्या लक्षात आली. त्यांनी मुलीसह हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भादवी ३६७ (अ) (ब) पोक्सो कायदा अंतर्गत नराधम मामावर गुन्हा दाखल केला. तसेच काही तासात आरोपीला अटक केल्यावर, आरोपीने गुन्हा कबूल दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपीला १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आई-वडील कामाला गेल्यानंतर खेळण्यासाठी आजी, आजोबाकडे गेलेल्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर गेल्या दोन महिन्या पासून मामा अत्याचार करीत असल्याचा संशय मुलीच्या आईने पोलिसांकडे व्यक्त केला. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून एका आठवड्यात बलात्काराच्या तीन घटना शहरात उघड झाल्या आहेत. हिललाईन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद पाटील यांच्या पथकाने काही तासात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अंबिका धस्ते करीत आहेत.

Read in English

Web Title: Mama raped 6-year-old Chimurdi, accused remanded in police custody till September 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app