टी सिरीजचे MD भूषण कुमार यांना पैशासाठी धमकवल्याप्रकरणी मल्लिकार्जुन पुजारीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 15:43 IST2021-07-17T15:40:14+5:302021-07-17T15:43:33+5:30
पुजारी याने भूषणला जीवे मारण्याची ही धमकी दिली होती. ज्याचे फोन रेकॉर्डिंग टी सिरीजकडे आहे.

टी सिरीजचे MD भूषण कुमार यांना पैशासाठी धमकवल्याप्रकरणी मल्लिकार्जुन पुजारीवर गुन्हा दाखल
मुंबई- टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक (MD) भूषणकुमार यांच्यावर बलात्काराची खोटी तक्रार करणे, तक्रार न करण्यासाठी पैशांची मागणी करणे, तसेच मीडियामध्ये बदनामी केल्याप्रकरणी संबंधित पीडितेचा मित्र मल्लिकार्जुन पुजारीविरुद्ध शनिवारी अंबोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषणकुमार यांचे काका, निर्माते तसेच टी सिरीज सुपर कॅसेट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक किशनकुमार चंद्रभान अरोरा (५६) यांनी ही तक्रार केली असून पोलीस चौकशी करत आहेत.
पुजारी याने भूषणला जीवे मारण्याची ही धमकी दिली होती. ज्याचे फोन रेकॉर्डिंग टी सिरीजकडे आहे. त्यांनी ते पोलिसांना दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.