मलकापूर: आगशिवनगरात मद्यधुंद डॉक्टरकडून 'हिट अँड रन'; दोन दुचाकी, दोन महिला, एका वृद्धाला उडवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 00:30 IST2025-07-17T00:29:48+5:302025-07-17T00:30:21+5:30

राजाराम जगताप असं डॉक्टरचे नाव, अपघातात तिघे गंभीर जखमी

Malkapur: Drunk doctor commits 'hit and run' in Agashivnagar; Two two-wheelers, two women, and an elderly man were hit... | मलकापूर: आगशिवनगरात मद्यधुंद डॉक्टरकडून 'हिट अँड रन'; दोन दुचाकी, दोन महिला, एका वृद्धाला उडवलं...

मलकापूर: आगशिवनगरात मद्यधुंद डॉक्टरकडून 'हिट अँड रन'; दोन दुचाकी, दोन महिला, एका वृद्धाला उडवलं...

लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर: मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकीसह दोन महिला व एका वृद्ध इसमास उडवले. या हिट अँड रन घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड येथील शिवछावा चौकात बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संबंधित मध्यधुंद डॉक्टरला युवकांसह कराड शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्ग पोलीस चौकीत ताब्यात घेतले.

डॉक्टर राजाराम जगताप (रा. कार्वे, ता. कराड असे मद्यधुंद डॉक्टरांचे नाव आहे. तर पोपट कांबळे (वय अंदाजे ६५ रा. आगशिवनगर) व भंडारे मायलेकी (वय अंदाजे ६० आणि ३५ रा. आगाशीवनगर) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मद्यधुंद डॉक्टर कार( क्रमांक एम एच ५० ए ५६५९) मधून कराडच्या दिशेने जात होता. कराड ढेबेवाडी मार्गावर मोरया कॉम्प्लेक्स ते शिवछावा चौक या २०० मीटरच्या अंतरात दोन दुचाकी सह एक वयस्कर इसम व दोन मायलेकींना उडवले. या अपघातात वृद्ध इसमाच्या पायावरून कार गेल्यामुळे गंभीर जखमी झाला. तर चालत घरी निघालेल्या मायलेकींना धडक दिल्याने त्या दोघी उडून रस्त्याकडल्या लावलेल्या दुचाकी वर पडल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दोन दुचाकीनाही कारने धडक दिल्यामुळे दुचाकींचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर आसपासच्या दुकानदारांनी अपघात स्थळी धाव घेतली.

अपघाताची खबर कराड शहर पोलिसांना देण्यात आली. कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी धावले. जखमींना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधित मद्यधुंद डॉक्टरला महामार्ग पोलीस चौकीत कारसह ताब्यात घेतले अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ

संबंधित डॉक्टर कार्वे ता. कराड यथील शासकीय आधार हॉस्पिटल मध्ये कार्यरत असल्याची चर्चा अपघातस्थळी होती. पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिकांना अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली.

Web Title: Malkapur: Drunk doctor commits 'hit and run' in Agashivnagar; Two two-wheelers, two women, and an elderly man were hit...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.