गाड्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा, तीन लाखांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:14 AM2019-02-09T03:14:03+5:302019-02-09T03:14:39+5:30

महागड्या गाड्या स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दीप्ती रविकांत मुळीक (३४, रा. माहीम, मुंबई) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खारेगाव येथील रहिवासी किरण शहा (४०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

Making a promise of cheap trains, cheating of three lakhs | गाड्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा, तीन लाखांची केली फसवणूक

गाड्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा, तीन लाखांची केली फसवणूक

googlenewsNext

ठाणे : महागड्या गाड्या स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दीप्ती रविकांत मुळीक (३४, रा. माहीम, मुंबई) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खारेगाव येथील रहिवासी किरण शहा (४०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

वेगवेगळी वाहने विक्री करणाऱ्या कंपन्यांशी आपली ओळख असल्याची दीप्ती हिने शहा यांना बतावणी केली होती. त्यानुसार, ३१ लाख ५६ हजार १२६ रुपयांची नामांकित कंपनीची कार अवघ्या आठ लाख ५० हजारांमध्ये मिळवून देते, असे सांगत त्यांच्यासह त्यांचा मॅनेजर चंदन यादव यांच्याकडून दोन लाख ८५ हजारांची रक्कम कळवा येथील रूपाली कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात तिने घेतली. ही रक्कम घेतल्यानंतर गाडी बुकिंग केल्याचे सांगून तीन लाख रुपयांची बनावट पावती व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांना दिली. मात्र, त्यांची कोणतीही गाडी बुकिंग न करता तसेच गाडीही न देता, त्यांची दोन लाख ८५ हजारांची फसवणूक केली.

हा प्रकार २१ डिसेंबर २०१८ ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला. आपले पैसे किंवा गाडी न मिळाल्याने शहा यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ७ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली.

आरोपी महिलेस अटक

आरोपी महिलेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी अटक केली. तिने आणखीही कोणाची फसवणूक केली आहे का, यामध्ये तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Making a promise of cheap trains, cheating of three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.