छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:22 IST2025-11-19T15:21:41+5:302025-11-19T15:22:39+5:30
Chhatisgarh ATS Action against ISIS: आयसिसच्या पाकिस्तानस्थित मॉड्यूलने भारतात अस्थिरता पसरवण्यासाठी बनावट नावांसह सोशल मीडिया अकाउंटचा वापर केल्याचे उघड

छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
Chhatisgarh ATS Action against ISIS: छत्तीसगडमधील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)रायपूर शहरात कारवाई केली आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) साठी काम करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएसने आयसिससाठी काम करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान, आयसिसच्या पाकिस्तानस्थित मॉड्यूलने भारतात अस्थिरता पसरवण्यासाठी बनावट नावांसह सोशल मीडिया अकाउंटचा वापर केल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान, हे हँडलर्स भारतीय अल्पवयीन तरुणांची दिशाभूल करून, त्यांना भारतविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे समजले. हिंसाचार, कट्टरतावाद आणि जिहादी विचारसरणी पसरवण्यासाठी ते लोक इन्स्टाग्राम आयडीचाही वापर करत असल्याचे निष्पन्न झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की या मॉड्यूलशी संबंधित पाकिस्तानी हँडलर्सनी अल्पवयीन मुलांना इंस्टाग्राम ग्रुप चॅटमध्ये अँड करून पद्धतशीरपणे कट्टरतावादी विचारसरणी रुजवली आणि त्याद्वारे आयसिस विचारसरणी आणि हिंसक उत्तेजक सामग्री पसरवण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही अल्पवयीन मुलांची ओळख पटली
छत्तीसगडमध्ये आयसिस मॉड्यूल स्थापन करण्यासाठी अल्पवयीन मुलांना प्रेरित केल्याचे पुरावे समोर आले. त्यांनी सांगितले की एटीएस आणि संबंधित तपास संस्थांच्या सतर्कतेमुळे आणि सतत सायबर देखरेखीमुळे आयसिसच्या प्रभावाखाली असलेल्या दोघांची ओळख पटली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाई (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याचदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, रायपूरमधील दोन अल्पवयीन मुले आयसिसशी संबंधित होती आणि एका पाकिस्तानी मॉड्यूलच्या निर्देशानुसार काम करत होती. ते सोशल मीडियावर सक्रिय होते आणि त्यांनी बनावट आयडी तयार केले होते. ते स्वतःहून याबाबत प्रेरित होते आणि इन्स्टाग्रामवर इतरांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी ते इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करत होते.