Major attacked on a young boy due to a minor dispute | किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
किरकोळ वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देजावेद खान ( वय ३१रा. युनिक अपार्टमेंट, सीवूड, नवी मुंबई) असे त्याचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जावेद खान याचा एकाशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता.

मुंबई - किरकोळ कारणावरुन एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन गंभीर जखमी करण्याची घटना ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. जावेद खान ( वय ३१रा. युनिक अपार्टमेंट, सीवूड, नवी मुंबई) असे त्याचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जावेद खान याचा एकाशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यातून त्याने मंगळवारी रात्री जावेद याच्यावर पोटावर डाव्या बाजूला तीक्ष्ण हत्याराने वार केले. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला असता त्याने पलायन केले. याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात एकाच भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

 

Web Title: Major attacked on a young boy due to a minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.