तलवारी घेऊन माफिया विकत आहेत अमली पदार्थ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 09:41 PM2021-04-19T21:41:41+5:302021-04-19T21:42:24+5:30

Crime News : पोलिसांनी ५ तलवारींसह ८ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले असून  तिघांना अटक केली आहे.

The mafia is selling drugs with swords | तलवारी घेऊन माफिया विकत आहेत अमली पदार्थ 

तलवारी घेऊन माफिया विकत आहेत अमली पदार्थ 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी संदीप नांगरे (३२), सूर्यकांत करळकर (२७) व शाकिर सय्यद (३४)  ह्या तिघांना अटक केली असून हे सर्व घोडबंदर शिफ्टिंगमध्ये राहणारे आहेत.

मीरारोड - अमली पदार्थ विकणारे माफिया हे हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे . पोलिसांनी ५ तलवारींसह ८ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले असून  तिघांना अटक केली आहे.  

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षातील  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  शैलेंद्र नगरकर सह अनिल पवार ,  वसीम शेख , गणेश वनवे असे पोलीस पथक रविवारी पहाटे गस्त घालत असताना घोडबंदर आरटीओ जवळील शिफ्टिंग वसाहत येथून ५ जण चालले होते. पोलिसांनी हटकले असता पळू लागले. पोलिसांनी तिघांना पाठलाग करून पकडले . तर दिघेंजण त्यांच्या कंदील तलवारी टाकून पळाले. 

पोलिसांना ५ तलवारी आणि ८० ग्रॅम इतके ८ लाखांचे मेफेड्रॉन हे अमलीपदार्थ सापडले. पोलिसांनी संदीप नांगरे (३२), सूर्यकांत करळकर (२७) व शाकिर सय्यद (३४)  ह्या तिघांना अटक केली असून हे सर्व घोडबंदर शिफ्टिंगमध्ये राहणारे आहेत. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे . जब्बार व साहिल हे फरार आरोपी आहेत . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार करत आहेत.

Web Title: The mafia is selling drugs with swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.