तरूणीने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन घातला गोंधळ, म्हणाली - लग्न कर नाही तर चॅट लीक करेन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:24 IST2022-11-07T12:24:04+5:302022-11-07T12:24:29+5:30

Crime News : तरूणीने सांगितलं की, काही वर्षाआधी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून एमपीमध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री झाली होती. 

Madhya Pradesh woman demands girlfriend from Rajasthan to marry her creates ruckus | तरूणीने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन घातला गोंधळ, म्हणाली - लग्न कर नाही तर चॅट लीक करेन...

तरूणीने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन घातला गोंधळ, म्हणाली - लग्न कर नाही तर चॅट लीक करेन...

Crime News : राजस्थानच्या नागौरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला तिची गर्लफ्रेंड धमकी देत लग्न करण्याचा दबाव टाकत आहे. ही घटना लाडनूं भागातील आहे. पीडित तरूणीने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. तरूणीने सांगितलं की, काही वर्षाआधी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून एमपीमध्ये राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री झाली होती. 

मैत्री प्रेमात बदलली आणि दोघींचं अफेअर सुरू झालं. दोघी एकमेकींना भेटू लागल्या. तरूणीने सांगितलं की, यादरम्यान त्यांच्या शारीरिक संबंधही झाले. यानंतर दुसरी तरूणी तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली. प्रकरण इतकं वाढलं की, आरोपी तरूणी पीडितेच्या घरी येऊन धमकी देऊ लागली.

पीडित तरूणीच्या घरी येऊन आरोपी तरूणीने खूप गोंधळ घातला. इथे येऊन ती तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली. जेव्ही पीडित तरूणीने नकार दिला तर आरोपी तरूणी तिचा हात पकडून जबरदस्तीने खेचत नेत होती. पीडित तरूणीच्या घरातील लोकांनी तिला रोखलं. यामुळे आरोपी तरूणी चिडली आणि तिने धमकी दिली की, ती सोशल मीडियावर दोघींचं चॅटींग लीक करेल. पीडित तरूणीने पोलिसांना सांगितलं की, आरोपी तरूणीने तिच्याकडे 10 लाख रूपयांची मागणी केली होती.

पीडित तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली आहे. सध्या तिची चौकशी केली जात आहे.

Web Title: Madhya Pradesh woman demands girlfriend from Rajasthan to marry her creates ruckus