दुसरं लग्न करून पोलीस स्टेशनमध्ये आला होता पती, पहिल्या पत्नीने केली धू-धू धुलाई; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 19:08 IST2021-07-17T18:59:51+5:302021-07-17T19:08:52+5:30
ही घटना होशंगाबादच्या पोलीस स्टेशनमधील आहे. इथे पती-पत्नीतील वादाचा मुद्दा समोर आला. इटारसी येथे राहणारा चंद्रकांत रोहनने आपल्या पत्नीकडून घटस्फोट घेत दुसरं लग्न केलं.

दुसरं लग्न करून पोलीस स्टेशनमध्ये आला होता पती, पहिल्या पत्नीने केली धू-धू धुलाई; व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) होशंगाबादमध्ये (Hoshangabad) घटस्फोट थांबवण्याच्या प्रयत्नात जेव्हा महिलेला समजलं की, पतीने दुसरं लग्न केलं तर तिचा राग अनावर झाला. पोलीस स्टेशनमध्येच महिलेने पतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्यासोबत दोन हात (Ex wife beat up husband) केले. महिलेने पतीची अशी काही धुलाई सुरू केली की, पतीला वाचवण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ आले. पतीला मारहाण करतानाचा महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ही घटना होशंगाबादच्या पोलीस स्टेशनमधील आहे. इथे पती-पत्नीतील वादाचा मुद्दा समोर आला. इटारसी येथे राहणारा चंद्रकांत रोहनने आपल्या पत्नीकडून घटस्फोट घेत दुसरं लग्न केलं. महिला मालती रोहरने घटस्फोट रोखण्यासाठी उच्च न्यायालयात अपील केली आहे. (हे पण वाचा : खतरनाक! सूड घेण्यासाठी पतीची हत्या करणाऱ्या व्यक्तीसोबत केलं लग्न, नंतर तिने त्याचा खेळ केला खल्लास)
यादरम्यान महिलेला समजलं की, पतीने दुसरं लग्नही केलं आहे. यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तक्रारीनंतर दोन्ही पक्षांना पोलीस स्टेशनमद्ये बोलवण्यात आलं होतं. दोन्ही पक्षांचं पोलीस ऐकून घेत असताना मालतीला राग अनावर झाला. (हे पण वाचा : धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर)
मालतीने कशाचाही विचार न करता पतीवर जोरदार हल्ला केला महिलेने सर्वांसमोर पतीला मारणं सुरू केलं. पोलिसांनी हे पाहिलं तर ते धावत पतीला वाचवण्यासाठी पोहोचले. मोठ्या मुश्कीलीने पोलिसांनी महिलेला शांत केलं. तेच पतीकडून याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली गेली नाही. ज्यानंतर दोघांनाही समजावून घरी पाठवण्यात आलं.