धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 12:44 PM2021-07-17T12:44:16+5:302021-07-17T12:44:47+5:30

वैशाली नगरमध्ये राहणारे अनोखी लाल मालवीय हे एमपीईबीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी तीन लग्ने केली होती. पहिलं लग्न दरगूबाईसोबत केलं होतं जी नंतर पतीला सोडून निघून गेली होती.

MP Crime News : Sehore father did three marriages son brutal murder family member over land dispute | धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर

धक्कादायक! वडिलांनी केली होती तीन लग्ने, दुसऱ्या पत्नीच्या मुलाने एक एक करून केले तीन मर्डर

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीहोर (Sehore) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडिया छितू गावात ३५ वर्षीय नरेंद्र मालवीयने आपल्या कौटुंबीक जमिनीच्या वादातून तीन लोकांची हत्या केली आहे. ट्रिपल मर्डर (Triple Murder) मुळे संपूर्ण परिसरात ही एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळावरून (Sehore Triple Murder) फरार झाला आहे. तर पोलिसांनी आरोपीवर १० हजारांचं बक्षीस घोषित केलं आहे.

वैशाली नगरमध्ये राहणारे अनोखी लाल मालवीय हे एमपीईबीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी तीन लग्ने केली होती. पहिलं लग्न दरगूबाईसोबत केलं होतं जी नंतर पतीला सोडून निघून गेली होती. त्यानंतर अनोखीलालने दुसरं लग्न गोकलबाईसोबत केलं होतं. या लग्नातून त्यांना नरेंद्र हा मुलगा झाला. या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर अनोखीलालने चिंताबाईसोबत तिसरं लग्न केलं. यानंतर त्यांना दोन मुली पूनम आणि पूजा तसेच एक मुलगा कपिल झाला. (हे पण वाचा : पत्नीने फावड्याने दारूड्या पतीची केली हत्या, पोलिसांसमोर दोन मुलींनी केला खुलासा)

असं सांगितलं जात आहे की, कौटुंबीक जमिनीचा वाद बराच दिवसांपासून सुरू होता. अशात दुसऱ्या पत्नीचा मुलगा नरेंद्रने कोडिया छीतू गावात शेतावरी घरात राहणारी सावत्र आई ५० वर्षीय चिंताबाई, मावशी ४० वर्षीय अयोध्याबाई आणि सावत्र बहीण २६ वर्षीय पूनमची हत्या केली. आरोपी हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्यावर १० हजार रूपयांचं बक्षीसही ठेवलं आहे. 
 

Web Title: MP Crime News : Sehore father did three marriages son brutal murder family member over land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.