Crime News : साखरपूडा झाला, तरी एका मुलीशी फोनवर बोलत होता पोरगा; वडिलांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:45 AM2022-01-18T09:45:46+5:302022-01-18T09:46:03+5:30

Crime News : वडिलांनी पत्नी आणि मुलीच्या मदतीनं मृतहेदाची लावली विल्हेवाट.

madhya pradesh crime news burhanpur father mother and sister killed man | Crime News : साखरपूडा झाला, तरी एका मुलीशी फोनवर बोलत होता पोरगा; वडिलांनी केली हत्या

Crime News : साखरपूडा झाला, तरी एका मुलीशी फोनवर बोलत होता पोरगा; वडिलांनी केली हत्या

Next

Crime News : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. यानंतर पत्नी आणि मुलीसह त्यानं मुलाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी एका दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली.

बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली. "ही घटना निबोला पोलीस स्थानक क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. ५ जानेवारीला रुपारेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृत व्यक्तीचा त्याच्या कुटुंबीयांशी सातत्यानं वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या हातापायांनाच बांधण्यात आलेली दोरी ही त्याच्या घरी सापडली. या आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहिणीची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ​​हत्येची हत्या केल्याचं सांगितलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाथरूमच्या भिंतीला डोकं आपटलं
"रामकृष्ण याचा साखरपुडा झाला होता. असं असूनही तो दिवसभर दुसऱ्या मुलीशी बोलत असायचा," असं त्याच्या आई, वडील आणि बहिणीने सांगितले. २ जानेवारीच्या रात्री दहाच्या सुमारास रामकृष्ण हा एका तरुणीशी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याचे वडील भीमन सिंह संतापले आणि त्यांनी रामकृष्णवर ओरडले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी रामकृष्णला कानशीलात लगावली आणि त्याला धक्का दिला.

धक्का दिल्यानंतर तो बाथरूमच्या दरवाज्यावर आपटला आणि जमिनीवर कोसळला. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या छातीवर जोरात लाथ मारली. ज्यावेळी त्याच्या शरिराची कोणतीही हालचाल दिसली नाही, तेव्हा वडिलांनी घाबरून त्याचे हात पाय दोरीने बांधले. यानंतर वडील, आई आणि त्याची बहिण यांनी मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीत फेकला. आरोपींची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजरकरण्यात आलं. न्यायालयानं त्यांची रवानगी आता तुरूंगात केली आहे.

Web Title: madhya pradesh crime news burhanpur father mother and sister killed man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app